PM Narendra Modi Rajya Sabha Speech
PM Narendra Modi Rajya Sabha Speechesakal

PM Modi Budget Speech: 2014च्या अंतरिम बजेटचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसवर निशाणा; म्हणाले, 11 व्या स्थानी...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी आपल्या दहा वर्षांचा काळाची पूर्वीच्या काँग्रेस सरकारशी तुलना केली.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारचा दहा वर्षांचा काळ आणि त्यापूर्वीच्या काँग्रेस शासनकाळ याची तुलना केली. तसेच मागच्या सरकारच्या काळातील अंतरिम बजेटचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. (pm modi budget speech modi targets congress referring to interim budget 2014)

मोदी म्हणाले, भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला आज संपूर्ण जग कौतुक करतंय. जग आर्थिक संकटातून जात असताना जगाला भारताचं कौतुक वाटतं आहे. आजच्या भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला पाहता ज्या वेगानं देश प्रगती करतो आहे, त्यामुळं मी म्हटलंय की, आमच्या तीसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, ही मोदींची गॅरंटी आहे.

PM Narendra Modi Rajya Sabha Speech
Use of Children in Election: लहान मुलं निवडणूक प्रचार करताना दिसल्यास उमेदवारावर कारवाई होणार; निवडणूक आयोगाची नवी नियमावली

जेव्हा आम्ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असं सांगतो तेव्हा विरोधक तर्क देतात की, त्यात विशेष काही नाही ती तर आपोआप होणारच आहे. पण मी जरा सरकारची भूमिका काय असते हे सभागृहाला आणि देशातील तरुणांना सांगू इच्छितो. २०१४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात जे अंतरिम बजेट आलं होतं, त्यावेळी कोणाचं राज्य होतं ते देशाला माहिती आहे.

PM Narendra Modi Rajya Sabha Speech
Chandigarh Mayoral Polls: सुप्रीम कोर्टाचा संताप! निवडणूक घेणाऱ्या रिटर्निंग ऑफिसरला झाप झाप झापलं

या अंतरिम बजेट मांडताना ब्रह्मांडातले मोठे अर्थमंत्री म्हणत होते की, २०१४ मध्ये ११ व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था पोहोचल्यानंतर किती गौरव केला जात होता. पण आता पाचव्या स्थानी पोहोचल्यावर काय होतंय? पुढे त्यांनी म्हटलं की, तिसऱ्या क्रमांकावर आपण तीस वर्षात पोहोचू म्हणजेच २०४४ पर्यंत आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. हा यांचा विचार आणि मर्यादा आहे. स्वप्न पाहण्याचं सामर्थ्यही ते गमावून बसले होते. तीस वर्षांची वाट पाहण्यास त्यांनी देशातील तरुण पिढीला सांगितलं होतं.

PM Narendra Modi Rajya Sabha Speech
QR Code on Statue : तब्बल 3,000 वर्षांपूर्वीच्या मूर्तीवर दिसला QR कोड? व्हायरल होतोय फोटो

पण मी आपल्याला विश्वास देतो की, आम्ही ३० वर्षे लागू देणार नाही ही मोदींची गॅरंटी आहे की, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. कसे विचार होते त्यांचे, त्यांना ११ व्या स्थानी देखील गौरव वाटत होता. मग तर पाचव्या क्रमांकावर पोहोचल्यावरही त्यांना खूश व्हायला हवं, असंही मोदी यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com