Russia Ukraine Crisis : रशिया, युक्रेन युद्धावर PM मोदींनी स्पष्ट केले भारताचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi clarifies Indias views on Russia, Ukraine war

रशिया, युक्रेन युद्धावर PM मोदींनी स्पष्ट केले भारताचे मत

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात कोणीही जिंकणार नाही. चर्चेतून समस्येवर तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास आहे. आम्ही युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर चर्चा केली. आम्ही शांततेच्या बाजूने आहोत आणि युद्ध संपवण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सोमवारी (ता. २) जर्मनीचे चांसलर ओल्फ स्कोल्झ यांच्याशी चर्चा केल्यानंतर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांनी शत्रुत्व संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संवाद आणि मुत्सद्देगिरीने हे प्रकरण सोडवले पाहिजे. जोपर्यंत युक्रेनबाबत भारताचा प्रश्न आहे, भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. दोन्ही देशांनी वैर संपवून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून चर्चेच्या टेबलावर यावे. असे आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलो आहोत, असे रविवारी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी रशिया-युक्रेन युद्धावर भारताची बाजू घेताना म्हटले.

हेही वाचा: मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना नोटीस; महाआरती न करण्याचे आवाहन

रशियाने (Russia) २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत रशिया आणि युक्रेनला युद्ध थांबवून चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन करीत आहे. रशिया-युक्रेन (Ukraine) युद्धाबाबत भारताने अनेक जागतिक व्यासपीठांवरून भूमिका मांडली आहे. आजही भारत आपल्या भूमिकेवर कायम आहे. हा प्रश्न दोन्ही देशांमधील संवादातून सोडवला गेला पाहिजे. भारताच्या जागतिक मित्र राष्ट्रांनाही रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताचे मत माहीत आहे. त्यांनी भारताच्या बाजूचे कौतुक केले आहे.

Web Title: Pm Modi Clarifies Indias Views On Russia Ukraine War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top