मठात जाताना मोदीजी राजकारणाच्या चपला काढायला विसरले; रामकृष्ण मठाकडून नाराजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

स्वामी विवेकानंद जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बेलूर येथील रामकृष्ण मठात भाषणाला बोलावले होते. बेलूर मठात जातांना मोदी आपली चप्पल बाहेर काढायला विसरले. या गोष्टीमुळे सर्वत्र नाराजी पसरली असून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

बेलूर : स्वामी विवेकानंद जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बेलूर येथील रामकृष्ण मठात भाषणाला बोलावले होते. बेलूर मठात मोदींनी राजकारणावर भाषण दिल्याने मठातील पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. या गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेलूर मठ येथे बोलताना CAAच्या प्रचाराचे भाषण दिले. रामकृष्ण मिशन व मठ दोन्हींचेही जनरल सेक्रेटरी स्वामी सुविरानंद यांनी मोदीजींच्या या भाषणावर आक्षेप घेत म्हणले की, "आम्ही एक सर्व समावेशक संस्था आहोत, आमच्यातील संन्यासी हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अश्या सर्व समाजघटकांतून आलेले आहेत. इथे आम्ही सख्ख्या भावंडांप्रमाणे राहतो."

छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

सत्ता प्राप्तीसाठी धर्माचा वापर करणाऱ्या मूठभर हिंदुत्ववाद्यांपेक्षा सत्तेच्या मागे न लागणारा एक मोठा सहिष्णु हिंदू समाज या देशात आहे. रामकृष्ण मिशन, गुरुदेव सेवाश्रम सारख्या असंख्य संस्था, संघटनांमधून तो या देशाला एकत्र धरून असल्याचेही त्यांनी म्हटले.

महाराष्ट्राचे चार वेगळ्या राज्यांत विभाजन करा; कोणी दिल्ला सल्ला?

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रामकृष्ण मिशनच्या मुख्यालयात मुक्कामी होते. बेलूर मठात थांबणारे ते पहिले पंतप्रधान असल्याने त्यांचे कौतुकही झाले होते. मागील काळात इंदिरा गांधीसह देशाचे अनेक पंतप्रधानांनी बेलूर मठाचा दौरा केला होता परंतु, मठात मुक्कामी कोणीही थांबले नव्हते. मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi gave Pro CAA speech in Ramkrushna Math belur