esakal | महाराष्ट्राचे चार वेगळ्या राज्यांत विभाजन करा; संघाच्या 'या' नेत्याने दिला सल्ला?

बोलून बातमी शोधा

State Division Is The Only Solution For India says M G Vaidya
  • केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करून कार्यवाही करण्याची मागणी वैद्य यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे चार वेगळ्या राज्यांत विभाजन करा; संघाच्या 'या' नेत्याने दिला सल्ला?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्राचे चार वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभाजन करण्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. वैद्य यांनी दिला आहे. देशात कोणत्याही राज्याची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आणि तीन कोटींपेक्षा अधिक असू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करून कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोवा राज्याचा महाराष्ट्रात समावेश करण्याचा सल्लाही वैद्य यांनी दिला आहे. गोव्यासह कोकण राज्य, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा अशी महाराष्ट्रात चार राज्ये स्थापन करावीत असे वैद्य म्हणाले आहेत. पुद्दुचेरीचा तामिळनाडू मध्ये आणि दिव आणि दमण गुजरातमध्ये समाविष्ट करून पूर्वांचलसारख्या लहान राज्याचा संघ करून त्यांचे संघराज्य बनवावे अशी सूचनाही त्यांनी केली आहे. मुंबईचा समावेश कोकण राज्यांमध्ये करून त्याला कोकणची राजधानी करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची राजधानी पुणे, मराठवाड्याची औरंगाबाद, आणि विदर्भाची राजधानी नागपूर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

भाजप आमदाराची दादागिरी, शेजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशचेही सहा राज्यांमध्ये विभाजन करता येईल असे त्यांनी म्हटले आहे. वैद्य म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचना सुद्धा याच पद्धतीने आहे उदा. संघाच्या देवगिरी प्रांतांमध्ये मराठवाडा आणि जळगाव आणि धुळे यांचा समावेश होतो.