आठ वर्षांत माझं डोकं कोणापुढं झुकू दिलं नाही : पंतप्रधान मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi Gujarat Visit News

'गरिबांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं ही आमची वचनबद्धता आहे.'

आठ वर्षांत माझं डोकं कोणापुढं झुकू दिलं नाही : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi Gujarat Visit News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजकोट येथील अटकोट इथं नव्यानं बांधलेल्या मातोश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. यानंतर देशाला संबोधित करताना मोदींनी भाजप सरकारनं केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.

मोदी म्हणाले, गरिबांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं ही आमची वचनबद्धता आहे. 3 कोटींहून अधिक गरीबांना पक्की घरं मिळाली असून 10 कोटींहून अधिक कुटुंबांना ODF मधून मुक्ती मिळालीय. तर, 9 कोटींहून अधिक गरीब महिलांची धुरापासून सुटका झालीय. शिवाय, 2.5 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांकडं वीज आहे. तर, 6 कोटींहून अधिक कुटुंबांना वीज उपलब्ध झालीय, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. दरम्यान, आठ वर्षांत मी माझं डोकं कोणापुढं झुकू दिलं नाही, असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा: पंजाब सरकारचे धडाधड निर्णय; आता 424 व्हीआयपींची 'सुरक्षा' घेतली काढून

मोदी पुढं म्हणाले, आमचं सरकार नागरिकांना 100 टक्के सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम राबवत आहे. प्रत्येक नागरिकाला सुविधा उपलब्ध करून देण्याचं आमचं उद्दिष्ट असेल. यात कोणताही भेदभाव अथवा भ्रष्टाचाराला थारा नाही. कोरोना महामारीच्या काळात देशाचं मोठं नुकसान झालंय. मात्र, गरीबांसाठी आमचं सरकार कुठंही कमी पडलं नाही.

हेही वाचा: भाजप बहुमताच्या एकदम जवळ; कर्नाटक विधान परिषदेवर 7 उमेदवारांची बिनविरोध निवड

आमच्या माता-भगिनींच्या जन धन बँक खात्यात पैसे जमा केले. तसेच शेतकरी-मजुरांच्या बँक खात्यातही पैसे जमा करण्यात आले आहेत. शिवाय, गरिबांचं स्वयंपाकघर चालू राहावं म्हणून मोफत गॅस सिलिंडरची व्यवस्थाही केली. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशसेवेची 8 वर्षे पूर्ण करत आहे. या काळात आम्ही कोणतंही चुकीचं काम केलं नाही. गेली अनेक वर्षे आम्ही गरीबांची सेवा, सुशासन आणि गरिबांचं कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिलंय. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राला अनुसरून आपण देशाच्या विकासाला नवी गती दिलीय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Pm Modi Gujarat Visit Today Inauguration Nano Urea Plant Multispeciality Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GujaratNarendra Modi
go to top