कोणतीही बँक गावातील व्यक्तीला कर्ज नाकारणार नाही; मोदींची ग्वाही

Modi SVAMITVA
Modi SVAMITVA

दिल्ली : पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी आज ‘Survey of Villages and Mapping with Improvised Technology in Village Areas’ (SVAMITVA) म्हणजेच 'स्वामित्व' योजनेचा शुभारंभ केला. देशातील खेड्यापाड्यांचे परिवर्तन करणारे हे एक ऐतिहासिक  पाऊल आहे, असं मोदी म्हणाले. या योजनेबाबतची उपयोगिता सांगताना मोदी म्हणाले की, आता कोणतीही बँक गावातील व्यक्तीला कर्ज नाकारणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे या 'स्वामित्व' योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत 6 राज्यातील 763 गावांमध्ये प्रॉपर्टी कार्डच्या वितरणाची सुरवात मोदींच्या हस्ते  झाली. या कार्यक्रमात कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर देखील उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आज ज्या एक लाख लोकांना आपल्या घराचे स्वामित्व पत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे, ज्यांनी आपले कार्ड डाऊनलोड केलं आहे, त्यांचं मी खुप खुप अभिनंदन करतो. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत आज देशात आणखी एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. स्वामित्व योजना खेडोपाड्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत करणार आहे. 
पुढे ते म्हणाले की, मला खुप आनंद होत आहे की आज हे इतकं मोठं काम त्या दिवशी होत आहे, ज्यादिवशी भारताच्या दोन महान सुपुत्रांचा जन्म झाला आहे. एक आहेत भारताचे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि दुसरे भारतरत्न नानाजी देशमुख. यांच्या केवळ जन्मदिवसाची तारीख एकसारखी नाहीये तर त्यांचा संघर्ष आणि त्यांचे आदर्श देखील एकसारखेच राहिलेले आहेत.

या योजनेचे महत्व सांगताना मोदी म्हणाले की, आजपर्यंत गावांमध्ये असे अनेक तरुण असतील जे आपल्या हिंमतीवर काही करु इच्छित आहेत. मात्र घर असूनही त्यांना आपल्या घराच्या नावावर बँकेतून कर्ज घेताना काहीवेळा अडचणींचा सामना करावा लागत होता. स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डला दाखवून आता बँकेमधून सहजतेने कर्ज मिळणे आता सुलभ झाले आहे. 

गेल्या 6 वर्षांत आपले पंचायती राज यंत्रणेला सशक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. स्वामित्व योजना त्या यंत्रणेला अधिक मजबूत करेल. गेले काही दशके खेडोपाड्यातील लोक बँक खाते, गॅस कनेक्शन आणि शौचालयापासून वंचित होते. मात्र, आज सर्वांकडे हे उपलब्ध आहे. दशकांपर्यंत गावातील कोट्यावधी लोकांकडे आपले स्वत:चे घर नव्हते. आज गावातील जवळपास 2 कोटी गरिब परिवारांना आपले स्वत:चे पक्के घर मिळाले आहेत. भारतातील गाव आणि गावात राहणारे लोकांसाठी जितके काम गेल्या 6 वर्षांत झाले आहे तेवढे काम स्वातंत्र्यानंतर 6 दशकांनंतर झाले नव्हते. गावांना आणि तिथल्या गरीबांना याप्रकारे वंचित ठेवणं हे काही लोकांच्या राजकारणाचा आधार आहे, असं इतिहास सांगतो. आम्ही त्या गरीबांना या वंचिततेपासून मुक्त करण्याचे अभियान चालवले आहे, असं मोदी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com