esakal | मन की बात : 100 वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची प्राचीन मूर्ती पुन्हा भारतात - PM मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi mann ki baat

ती मूर्ती 1913 साली वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती.

मन की बात : 100 वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची प्राचीन मूर्ती पुन्हा भारतात - PM मोदी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रत्येक भारतीयाला हे ऐकून अभिमान वाटेल की, देवी अन्नपूर्णाची एक प्राचीन मूर्ती आता कॅनडातून पुन्हा भारतात आणली जाणार आहे. भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा हा नेहमीच आंतरराष्ट्रीय टोळ्यांकडून बळी पडत आला आहे. अशीच ही 100 वर्षांपूर्वीची अन्नपूर्णेची मुर्ती भारतात पुन्हा आगमन करत आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते आज देशवासीयांसोबत मन कि बात मध्ये बोलत होते. 

हेही वाचा - नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात CRPF च्या मराठी अधिकाऱ्याचा मृत्यू, सात जण जखमी

मन कि बात मध्ये बोलताना मोदी म्हणाले की, आज मी सर्वांना एक आनंदाची बातमी देणार आहे. ही बातमी ऐकून प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटेल. देवी अन्नपूर्णाची एक खूप जुनी मूर्ती भारतातून चोरण्यात आली होती. ती 1913 साली वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. मात्र, ती परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे तसेच कॅनडा सरकारचे मी आभार मानतो.

पुढे त्यांनी म्हटलं की, या मूर्तीचा आणि काशी शहराचा जूना आणि खास असा संबंध आहे. ती जूनी मूर्ती भारतात परत येणं आपल्या सर्वांसाठी सुखद आहे. काही आंतरराष्ट्रीय टोळ्या याप्रकारचा मौल्यवान प्राचीन ठेवा चोरून तो आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किंमतीला विकतात. अशाच अन्नपूर्णा मूर्तीला भारतात परत आणण्यासाठी दावा करण्यात येत आहे. निव्वळ हिच नव्हे तर आपल्या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांत भारतातून बाहेर गेलेल्या अशा अनेक मूर्त्या पुन्हा भारतात आणण्यात यश प्राप्त झालं आहे.

हेही वाचा - PUC सर्टिफिकेट नसेल तर आता RC जप्त; 1 जानेवारीपासून वाहतुकीचे नियम कडक

काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा आठवडा साजरा करण्यात आला. यामध्ये आपल्या संस्कृतीप्रेमींसाठी जुन्या काळात परत जाण्यासाठी तसेच त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठीची एक संधी उपलब्ध होते. कोरोनोच्या काळातही आपण हा सप्ताह नव्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या काळात संस्कृतीच कामी येते, असंही त्यांनी म्हटलं. 

loading image
go to top