

PM Modi
Esakal
संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत देशवासियांसाठी संदेश जारी केलाय. आम्ही महिला आरक्षणाचे आश्वासन पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिलीय. देशातील नारी शक्तीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यामध्ये येणारा प्रत्येक अडथळा पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.