PM Modi Pune Visit : लोकमान्य टिळक पुरस्काराची रक्कम ज्या योजनेला दिली ती 'नमामि गंगे योजना' काय? जाणून घ्या

PM Modi Pune Visit: पुण्यात मिळालेल्या लोकमान्य टिळक पुरस्काराची एक लाखाची रक्कम या योजनेला दिली.
Namami Gange Scheme, PM Modi Pune Visit
Namami Gange Scheme, PM Modi Pune Visit esakal

What Is Namami Gange Scheme In Marathi :

"ज्यांच्या नावात गंगाधर आहे अशा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे मिळणाऱ्या पुरस्कारातील रक्कम मी त्याच गंगेच्या नावे असणाऱ्या नमामि गंगे या योजनेला देत", असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुण्यात त्यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात सांगितलं.

ही नमामि गंगे योजना नक्की आहे काय, जाणून घेऊया.

काय आहे योजना?

सरकारने गंगा नदीचे प्रदुषण संपवण्यासाठी आणि नदीला पुनर्जीवित करण्यासाठी नमामि गंगे नावाची गंगा संरक्षण चळवळ सुरू केली आहे. गोमुखापासून ते हरिद्वारापर्यंतच्या दरम्यान गंगा ४०५ किलोमीटर आहेत. या अंतरात गंगाकाठावर वसलेल्या १५ शहरे आणि १३२ गावांमुळे इथल्या कचरा, सांडपाणी आणि सीव्हरेज मैल्यामुळे गंगेला दुषित केले आहे.

याअंतर्गत २०१७ पासून उत्तराखंडात गंगेच्या शुद्धतेसाठी प्रयत्न सुरु झाले आणि सध्या ६५ प्रोजेक्ट्स सुरु झाले आहेत.

Namami Gange Scheme, PM Modi Pune Visit
PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदी यांनी दगडूशेठ मंदिरात नेमकी कोणती पूजा केली?

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-2020 पर्यंत नदीच्या स्वच्छतेसाठी 20,000 कोटी रुपये खर्च करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावित कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे, ही गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी अर्थसंकल्प चौपट करणे आणि 100% केंद्रीय वाटा असलेली केंद्रीय योजना आहे.

हे ओळखून गंगा संवर्धन आणि स्वच्छता गंगा हे एक मोठे आव्हान आहे, त्यामुळे या योजनेच्या यशासाठी केंद्र, विविध मंत्रालये आणि राज्य यांच्यातील चांगले संबंध, भागीदारी, सहभाग वाढवून प्रणाली सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Namami Gange Scheme, PM Modi Pune Visit
Namami Gange Programme : ‘नमामि गंगे’ची संयुक्त राष्ट्रांकडून दखल

भारतात गंगेला जेवढे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्व आहे, तेवढेच महत्व त्यावर अवलंबून जनतेसाठीही आहे. त्यामुळे गंगा नदीचे प्रदुषण संपवण्यासाठी आणि पुनर्जीवीत करण्यासाठी नमामी गंगे या चळवळीची सुरुवात करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची अंमलबजावणी स्टार्ट-अप उपक्रम (तात्काळ अंमलात आणली जाणे), मध्यम-मुदतीचे उपक्रम (डेडलाइनच्या 5 वर्षांच्या आत अंमलात आणणे), आणि दीर्घकालीन उपक्रम (10 वर्षांच्या आत अंमलात आणणे) मध्ये विभागले गेले आहे.

Namami Gange Scheme, PM Modi Pune Visit
PM Modi Pune Visit : मोदींकडून पुरस्काराची रोख रक्कम 'नमामि गंगे'ला अर्पण

या योजनेअंतर्गत केली जाणारी कामं

  • जुन्या घाटांचे जीर्णोद्धार

  • नवे घाट, चेंजींग रुम, स्वच्छतागृह, बैठक व्यवस्था, ऑक्सिडेशन प्लांट बायोरिमेडिएशन प्रक्रियेद्वारे

  • सीवेज ट्रीटमेंट प्लांटची निर्मिती

  • गंगाकाठच्या शहरांमध्ये एसटीपीची निर्मिती

  • गंगा व त्याच्या उपनद्यांच्या काठावर वृक्षारोपण

  • रिव्हर फ्रंट डेव्हलंपमेंटची निर्मिती (आधुनिकीकरण आणि नुतनीकरण)

  • गंगेत्या किनाऱ्यावर झाडी लावणे.

  • स्नान घाट आणि स्मशान घाटांची निर्मिती.

  • विविध संस्था आणि संघटनांच्या मदतीने जनजागृती केली जाईल.

  • गंगा नदीत जाणाऱ्या घाण नाल्यांचे टॅपिंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com