

PM Modi Stayed Awake All Night Monitoring Delhi Blast Investigation
Esakal
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामागच्या सूत्रधारांना सोडणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली स्फोटावर प्रतिक्रिया दिलीय. भूतानमध्ये जागतिक शांतता प्रार्थना महोत्सव आणि भूतानच्या चौथ्या राजाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. भूतानच्या जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवात भारत सहभागी झाला आहे. जगभरातून आलेले संत सोबतच जगाच्या शांततेची प्रार्थना करतायत. त्यात १४० कोटी भारतीयांच्याही प्रार्थना आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.