esakal | कोरोना नियंत्रणासाठी 3 गोष्टींवर भर द्या; केंद्रीय गृहमंत्री शहांकडून राज्यांना सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi, Corona Review Meet, PM Modi Review Meet,PM Modi, Covid19

या बैठकीत अमित शहांनी कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी ती मुद्यांवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यू दर 1 टक्क्याहून कमी आणि रुग्णांची वाढणारी संख्या 5 टक्के पेक्षा कमी राहिल यावर भर द्यावा लागेल.  कन्टेंटमेन्ट झोन प्रारुप बदलण्याची गरज असल्याचेही शहांनी यावेळी म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवड्यात रेड झोनचा आढावा घ्यावा.

कोरोना नियंत्रणासाठी 3 गोष्टींवर भर द्या; केंद्रीय गृहमंत्री शहांकडून राज्यांना सूचना

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करुन त्या-त्या  राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्षन यांच्याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बेधल यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी सहभागी होते.  

हेही वाचा - 5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा

या बैठकीत अमित शहांनी कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी ती मुद्यांवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यू दर 1 टक्क्याहून कमी आणि रुग्णांची वाढणारी संख्या 5 टक्के पेक्षा कमी राहिल यावर भर द्यावा लागेल.  कन्टेंटमेन्ट झोन प्रारुप बदलण्याची गरज असल्याचेही शहांनी यावेळी म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवड्यात रेड झोनचा आढावा घ्यावा.

हेही वाचा - अमित शहा झोपले होते का? रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावर ओवेसींनी दिलं भाजपला चॅलेंज

परिस्थितीनुसार तात्काळ योग्य त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी सूचना शहांनी केली.  राज्याचे मुख्यमंत्री (महाराष्ट्र) उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. याशिवाय कोरोनावरील लशीसंदर्भात  सीरम इस्टीट्यूटच्या अदार पूनावाला यांच्या संपर्कात असल्याचे सांगत लसीकरणा लसीकरण कार्यक्रमाच्या अमंबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली.  

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.  कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्यामागे अनेक कारणं असून दिल्लीतील प्रदुषणामुळे अधिक धोका निर्माण झाल्याचे सांगितले. कोरोनाची तिसरी लाट उसळण्याची भीती व्यक्त करत त्यांनी 1000 आसीयू बेड आरक्षित ठेवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.