

PM Modi's Friend Asgar Ali Vora Raises Bhayandar Land Dispute
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ८१ वर्षीय वृद्धाला जमीन वादात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील मीरा रोड इथं असगर अली वोरा यांनी आरोप केला होता की भाईंदरमध्ये त्यांच्या जमीनीवर अनधिकृतपणे ताबा मिळवला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या बांधकाम कंपनीशी संबंधित वादात ही जमीन अडकली होती. आता मेहता यांनी वादग्रस्त जमिनीवरील ताबा सोडण्याचा आणि त्यावर बांधकामाची परवानगी परत करण्याचा निर्णय घेतलाय.