तीन वर्षात २०० हून अधिक विमानतळांचे नेटवर्क होणार - PM मोदी

pm modi
pm modiANI
Summary

फक्त पर्यटनाला प्रोत्साहन देणं एवढाच विमानतळाचा उद्देश नाही तर यामुळे शेतकरी आणि पशुपालकांनासुद्धा फायदा होईल असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. बौद्ध भिक्षुंना श्रीलंकेतून घेऊन येणारं विमान कुशीनगरमध्ये उतरलं. उद्घाटनावेळी आय़ोजित कार्यक्रमात बोलातना मोदी म्हणाले की, भारत जगभरातील बौद्ध समाजाच्या प्रेरणेचं केंद्र आहे. रोजगारात वाढ होईल. फक्त पर्यटनाला प्रोत्साहन देणं एवढाच विमानतळाचा उद्देश नाही तर यामुळे शेतकरी आणि पशुपालकांनासुद्धा फायदा होईल असंही मोदी म्हणाले.

येत्या तीन वर्षात देशात २०० हून अधिक विमामनतळांचे नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिली. पूर्वांचल आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हे विमानतळ महत्त्वाचे आहे. भारत बौद्ध धर्माच्या आस्थेचं केंद्र आहे. जगभरातील बौद्ध समाजाची श्रद्धा आणि आस्थेचं भारत हे केंद्र आहे. त्यांच्या या आस्थेला, श्रद्धेला ही पुष्पांजली असल्याचं मोदी म्हणाले.

pm modi
'केंद्रीय तपास संस्थांचे काम घाबरवण्याचं नाही तर ...'

कुशीनगरचा विकासाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. उड्डाण योजनेंतर्गत गेल्या काही वर्षात ९०० हून अधिक नव्या मार्गांना परवानगी दिली आहे. तसंच यामध्ये ३५० पेक्षा जास्त हवाई सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. ५० पेक्षा अधिक एअरपोर्ट पहिल्यांदा सेवेत नव्हते ते सुरु केले आहेत असंही मोदींनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com