
PM Modi Says Citizens Are His Masters, Responds Calmly to Insults
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुन्हा एका आईवरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी भगवना शंकराचा भक्त आहे. मला कुणी कितीही शिव्या दिल्या तरी मी सगळं विष पचवतो. माझा रिमोट कंट्रोल फक्त देशाची १४० कोटी जनता आहे. तेच माझे मालक आहेत असंही मोदींनी म्हटलं. काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसनं भूपेन हजारिका यांचा अपमान केला. भाजपचं डबल इंजिन सरकार भूपेन हजारिका यांसारख्या आसामच्या महान सुपुत्राचं स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध आहे.