Modi Parliament Speech: 'नेहरु, इंदिरा गांधी भारतीयांना आळशी, अक्कल नसलेले समजत'; PM मोदींची टीका

Modi Parliament Speech: माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी या देशातील नागरिकांना आळशी समजत होत्या, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत बोलताना केली आहे
Modi Parliament Speech
Modi Parliament SpeechEsakal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर सभागृहात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसने देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही. काँग्रेस देशातील नागरीकांबाबत कसा विचार करतात ते सांगितल्यानंतर काँग्रेसला माझा राग येतो. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाचे तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी जे सांगितले होते, ते पुन्हा वाचून दाखवतो, असं म्हणत त्यांनी नेहरूंवर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले, 'भारतात अधिक मेहनत करण्याची सवय नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात. हे समजू नका त्यांचा समाज चमत्काराने विकसित झालेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे', असं म्हणत नेहरु भारतीय नागरीकांना आळशी समजत होते. भारतीय कमी अक्कल असलेले आहेत, असे नेहरुंचे म्हणणे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

Modi Parliament Speech
PM Modi Budget Speech: 2014च्या अंतरिम बजेटचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसवर निशाणा; म्हणाले, 11 व्या स्थानी...

इंदिरा गांधी यांची विचारसरणी जवाहरलाल नेहरूंपेक्षा फारशी वेगळी नव्हती- PM मोदी

इंदिरा गांधी यांची विचारसरणी जवाहरलाल नेहरूंपेक्षा फारशी वेगळी नव्हती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दुर्दैवाने आमचे काम जेव्हा पुर्णत्वास जात असते, तेव्हा आम्ही आत्मसंतुष्ट होतो आणि जेव्हा आमच्यासमोर संकट येते, तेव्हा नाउमेद होऊन जातो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे.

आजच्या काँग्रेसकडे आणि लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील नागरीकांचे आकलन चुकीचे असेल. पण काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Modi Parliament Speech
PM Modi: 'काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लॉन्च केल्यामुळे दुकानाला कुलूप लावण्याची वेळ', PM मोदींचा हल्लाबोल

'काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लॉन्च केल्यामुळे दुकानाला कुलूप लावण्याची वेळ'

काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लाँन्च केल्यामुळे त्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये काँग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनता आलं असतं, असंही मोदी पुढे म्हणाले आहेत.

Modi Parliament Speech
Paper Leak: विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा! पेपर लीक करणाऱ्यास १० वर्षे जेल! एक कोटीपर्यंतचा दंड, संसदेत विधेयक सादर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com