PM Modi: 'काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लॉन्च केल्यामुळे दुकानाला कुलूप लावण्याची वेळ', PM मोदींचा हल्लाबोल

PM Modi: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत संबोधित करत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर सभागृहात भाषण करताना त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
PM modi
PM modiEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर आभार व्यक्त करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. गेल्या १० वर्षात काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. पण त्यांनी चांगल्या नेत्यांना पुढे येण्याची संधी दिली नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी काँग्रेस, घराणेशाही, लोकशाही, विरोधक या मुद्द्यांवरूनही पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लाँन्च केल्यामुळे त्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये काँग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनता आलं असतं, असंही मोदी पुढे म्हणाले आहेत.

निवडणुकीत काही मेहनत घेतली असती, जनतेला काही संदेश दिला असता. पण यातही तुम्ही अयशस्वी झालात. विरोधकांची ही परिस्थिती काँग्रेसमुळे झाली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांना पुढे येण्याची संधी दिली नाही. लोकसभेतील अनेक खासदारांना पुढे येण्याची संधी दिली नाही. देशातील घराणेशाहीचा फायदा काँग्रेसने घेतला. मल्लिकार्जुन खरगे हे एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात गेले. गुलाब नबी आजाद यांनी पक्षाला रामराम केला. हे सर्व घराणेशाहीमुळे झालं, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

PM modi
PM Modi Budget Speech: 2014च्या अंतरिम बजेटचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसवर निशाणा; म्हणाले, 11 व्या स्थानी...

काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे खूप नुकसान झाले आहे. काँग्रेसने नेहमीच एकाच कुटुंबावर विश्वास ठेवला आहे. तो आपल्या कुटुंबासमोर कोणाचाही विचार करू शकत नाही. विरोधी पक्ष म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते (विरोधक) अपयशी ठरले. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मी नेहमीच म्हटले आहे.

PM modi
Chandigarh Mayoral Polls: सुप्रीम कोर्टाचा संताप! निवडणूक घेणाऱ्या रिटर्निंग ऑफिसरला झाप झाप झापलं

'विरोधक किती काळ समाजात फूट पाडणार? विरोधकांच्या या अवस्थेला काँग्रेस जबाबदार आहे. देशाला निरोगी आणि चांगल्या विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. देशाला घराणेशाहीचा फटका बसला आहे. काँग्रेसच्या दुकानाला टाळं लावण्याची वेळ आली आहे, असंही पुढे ते म्हणालेत.

PM modi
Sextortion: ७२८ लोकांना अडकवलं जाळ्यात अन् घातला लाखोंचा गंडा; सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश

देश घराणेशाहीने त्रस्त आहे. विरोधी पक्षात एकाच कुटुंबाचा पक्ष आहे. पण राजनाथ सिंह यांची स्वत:चा कोणताही पक्ष नाही. अमित शाह यांचाही स्वत:चा कोणताही राजकीय पक्ष नाही. एकच कुटुंब जिथे पक्षाचे सर्वस्व असणं लोकशाहीसाठी योग्य नाही. घराणेशाहीबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे, असंही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com