

PM Modi Accuses Congress of Compromising on Vande Mataram
Esakal
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून सोमवारी लोकसभेत वंदे मातरमवर चर्चेला सुरुवात झाली. वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. पंतप्रधानांच्या संबोधनावेळी सत्ताधारी खासदारांनी वंदे मातरम अशा घोषणाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १५० वर्षे त्या महान अध्याय आणि गौरवाची पुनर्स्थापना करण्याची संधी आहे. सदनात आणि देशातही या संधीला गमावलं नाही पाहिजे. हेच वंदे मातरम आहे ज्याने १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व वंदे मातरमच्या घोषणेत होतं. वंदे मातरमवर आजची ही चर्चा ऐतिहासिक असून याचा साक्षीदार होता आलं याचा मला गर्व आहे. ही चर्चा येणाऱ्या पिढीसाठी मोठी शिकवण असेल असंही मोदींनी सांगितलं