esakal | लॉकडाउन, थाळ्या वाजवा, दिवे लावा; वाचा मोदींच्या 7 भाषणांमधील घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

modi last 7 speech from janta curfew

देशात जनता कर्फ्यू लागू केल्याची घोषणा केली तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सातवेळा देशाला संबोधून भाषण केले. 

लॉकडाउन, थाळ्या वाजवा, दिवे लावा; वाचा मोदींच्या 7 भाषणांमधील घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले, की कोरोनाविरूध्द लढाईत जनता कर्फ्यूपासून आजतागायत भारतवासीयांनी मोठा प्रवास केला आहे. आर्थिक व इतर व्यवहारांत गती येत आहे. लोक जबाबदाऱ्या सांभाळून जीवनाला गती देण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सणासुदीच्या काळात बाजारपेठांतही हळूहळू व्यवहार वाढत आहेत. मागील ७-८ महिन्यांत भारताने परिस्थिती जशी सांभाळली त्यात आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. 

देशात जनता कर्फ्यू लागू केल्याची घोषणा केली तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सातवेळा देशाला संबोधून भाषण केले. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या घोषणा केल्या. तसंच त्यांनी जनतेला काळजी घेण्याचं आवाहनही केलं. 

19 मार्च
कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा देशात जनता कर्फ्यूची लागण केली. याची घोषणा करण्यासाठी मोदींनी 19 मार्चला देशाला संबोधित केलं होतं. देशात कोरोना साथीचा प्रवेश झाल्याने देशवासीयांना 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन. तसंच जनता कर्फ्यूची सांगता सायंकाळी 5 वाटता टाळ्या-थाळ्यांचा नाद करण्याचेही आवाहन त्यांनी केले होते. जवळपास 29 मिनिटे मोदी बोलले होते.

24 मार्च
देशात पहिल्या लॉकडाउनची घोषणा 24 मार्चला करण्यात आली. तेव्हा दुसऱ्यांदा मोदींनी देशवासियांना संबोधित केलं होतं. कोरोनाला रोखायचं असेल तर 21 दिवस सहकार्य करा असं सांगत देशव्यापी लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. यावेळीसुद्धा मोदींनी 29 मिनिटे भाषण केलं होतं. 

हे वाचा - पंतप्रधान मोदींचे भाषण फ्लॉप; भाजपने डिस्लाईक बटण केले ब्लॉक!

29 मार्च 
कोरोनाच्या संकटात आघाडीवर लढणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी घरामध्ये दिवे प्रज्वलित करण्याचं आवाहन 29 मार्च रोजी केलं होतं. यामध्ये 5 एप्रिलला रात्री 9 वाजल्यापासून 9 मिनिटे घरामध्ये दिवे प्रज्वलित करा असं मोदींनी 12 मिनिटांच्या भाषणातून सांगितलं होतं. प्रकाशाची ही ताकद कोरोनाच्या अंधारावर सांघिक मात करण्यासाठी उपयोगी पडेल असे भावनिक प्रतिपादन मोदींनी केलं होतं.

14 एप्रिल
पहिले लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा मोदींनी चौथ्या संबोधनावेळी केली होती. यामध्ये केंद्राने राज्यांकडून मागवलेल्या सूचनांनुसार 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढविल्याची घोषणा केली होती.  25 मिनिटांच्या भाषणात मोदींनी लॉकडाउनची घोषणा करतानाच आर्थिक पॅकेजही घोषित केलं होतं.  20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमधून गावांकडे परतणारे वा परतलेले स्थलांतरित मजूर, छोटे व्यावसायिक, हातावर पोट असणारे आदींना अर्थसाह्य तसेच सुलभ कर्जाची सवलत देण्यात आली होती.

हे वाचा - लॉकडाऊन संपला, कोरोना नाही; पंतप्रधान मोदींनी दिली काळजी घेण्याचा सल्ला

12 मे 
कोरोनाचं संकट वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 मे रोजी आणखी एक संबोधन केलं. यामध्ये मोदींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. 33 मिनिटांच्या भाषणातून मोदींनी आत्मिनिर्भर भारत योजनेची घोषणा केली होती. 

30 जून
कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे नियम हळू हळू शिथिल केले जात असतानाच मोदींनी गोरगरीबांसाठी मोठी घोषणा केली. 16 मिनिटे भाषण करताना त्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात असल्याचं सांगितलं.