PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.
PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

PM Modi On VoteJihad Speech : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान वोट जिहाद हा मुद्दा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जोरदार टीका केली आहे.

इंडि आघाडी मुस्लिमांना वोट जिहाद करायला सांगत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. इंडि आघाडीच्या एका नेत्याने त्यांची रणनिती देशासमोर उघड केली आहे. इंडी आघाडीने मुस्लिमांना वोट जिहाद करण्यास सांगितले आहे. आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद ऐकलं होतं, पण वोट जिहाद.... ही शिकलेल्या मुस्लिम कुटुंबातून हे पुढं आलं आहे. मदरशामधून आलेल्या मुलानं हे म्हटलं नाहीये, उच्च शिक्षीत कुटुंब आणि काँग्रेसमध्ये वरिष्ट पदावरील कुटुंब हे म्हणत आहेत. त्यांनी वोट जिहाद करा अशी घोषणा केली आहे.

इंडि आघाडीचे म्हणणे आहे की, सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन मतदान केलं पाहिजे. इंडि आघाडीने लोकशाहीच्या उत्सवात वोट जिहादचा मुद्दा पुढे करत लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला आहे. काँग्रेसच्या एकही नेत्याने याचा विरोध केला नाहीये. याला मुक संमती देण्यात आली आहे. वोट जिहादनंतर देखील काँग्रेसची तुष्टीकरणाची रणनिती पुढे नेली जात आहे.

इंडि आघाडी एसटी, एससी, ओबीसींना फोडण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे वोट जिहादच्या घोषणा दिल्या जात आहेत. यावरून त्यांचा हेतू किती घातक आहे हे लक्षात येते.

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका
Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

पंतप्रधान काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची भाची आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम खान यांच्या भाषणाचा संदर्भ देत हे विधान केले आहे. या भाषणामध्ये मारिया आलम यांना मुस्लिमांना 'व्होट जिहाद'साठीचे आवाहन केले होते.

गुजरातमध्ये आयोजित एका रॅलीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी इंडि आघाडीवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान सलमान खुर्शीद आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम खान यांच्यावर ३० एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील कायमगंज येथे जाहीर सभेत भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका
Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

एफआयआरनुसार, मारिया आलम खान यांनी अल्पसंख्याक समुदायाला ‘व्होट जिहाद’ करण्यास सांगितले. यानंतर गुजरातमधील आनंद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि विरोधकांच्या आघाडीवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या एक्स अकाउंटवरून त्यांच्या भाषणाची क्लीप शेअर करण्यात आली आहे. वोट जिहाद... घृणास्पद. काँग्रेसची हतबलता नव्या नीचांक गाठत आहे, असं कॅप्शन देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com