PM Modi Speech in Lok Sabha : PM मोदींच्या भाषणातील ११ महत्वाचे मुद्दे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Speech in Lok Sabha

PM Modi Speech in Lok Sabha : PM मोदींच्या भाषणातील ११ महत्वाचे मुद्दे

PM Modi Speech in Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech in Parliament) यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले.

यादरम्यान लोकसभेत दोन दिवसीय चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना पंतप्रधान मोदींनी उत्तरे दिली. यासोबतच त्यांनी राहुल गांधींसह विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही जोरदार निशाणा साधला.

पीएम मोदींची राहुल गांधींवर काव्यात्मक टीका

मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांचे नाव न घेता काव्यात्मक पद्धतीने त्यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, मी काल पाहत होतो की काही लोकांच्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांच्या उड्या पडत होत्या.

राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा अभिमान वाढवला

यावेळी मोदींनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा अभिमान तसेच आत्मविश्वास वाढवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, आपल्या दूरदर्शी भाषणात राष्ट्रपतींनी आपल्या सर्वांना आणि करोडो देशवासियांना मार्गदर्शन केल्याचे मोदी म्हणाले.

काही लोक देशाच्या प्रगतीचा अभिमान बाळगण्याऐवजी दु:खी आहेत

आपल्या भाषणात पीएम मोदींनी पाकिस्तानमधील परिस्थितीचा नाव घेऊन उल्लेख केला आणि म्हणाले, 'जेव्हा युद्धामुळे जगावर संकट येते. आजूबाजूच्या परिसरातही अर्थव्यवस्थेचे संकट आहे.

अशा स्थितीत भारत 5 व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत कोणत्या भारतीयाला अभिमान वाटणार नाही? G20 चे अध्यक्षपद मिळाले, सर्व भारतीयांना अभिमान वाटेल. पण 140 कोटी लोकांमध्ये असे काही आहेत ज्यांना देशाच्या प्रगतीचा अभिमान होण्याऐवजी दु:ख होत आहे.

सर्वत्र डिजिटल इंडियाचे कौतुक

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, सध्या संपूर्ण जगभरात 'डिजिटल इंडिया'चे कौतुक होत होते. त्याबद्दल चर्चा केल जात आहे. कोरोना महामारीच्या काळात देशाने पूर्ण उत्साहाने काम केले आहे. जीवन आव्हानांशिवाय नाही.

संकटाच्या काळातही देश जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज जगभरात भारताबद्दल सकारात्मकता आणि विश्वासाचे वातावरण आहे. आम्हाला जी-20 चे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, ही अभिमानाची बाब आहे.

2004 ते 2014 हे दशक घोटाळ्यांचे होते

पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा जगात तंत्रज्ञान बदलत होते, तेव्हा सत्तेतील लोकांनी 2जी घोटाळा केला. देशात राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या आणि तरुणांना चमकण्याची संधी मिळाली. त्या काळातही या लोकांनी घोटाळा केला.

दहशतवादी हल्ले झाले यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. 2014 पूर्वी देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होती. महागाई होती. ज्यांनी बेरोजगारी हटवण्याचे आश्वासन दिले, पण ते अपयशी ठरल्याचे मोदी म्हणाले.

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात घेण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोनाच्या काळात भारतनिर्मित लस तयार करण्यात आली. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात घेण्यात आली.

करोडो नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात आले. संकटाच्या या काळात, आम्ही 150 हून अधिक देशांमध्ये औषधे आणि लस पोहोचवल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

ईडीने विरोधकांना एकत्र आणले

यावेळी मोदींनी विरोधकांच्या एकजुटीचा समाचार घेतला. ते म्हणाले की, आज विरोधकांचे गीत मिले सूर मेरा तुम्हारा आहे. हे ऐक्य ईडीमुळे घडले आहे.

ईडीच्या तपासाने या लोकांना एका व्यासपीठावर आणल्याचे ते म्हणाले. या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजे की, ईडीनेच या लोकांना एका समान व्यासपीठावर आणले आहे. देशातील मतदार जे करू शकले नाहीत ते ईडीने केले.

मोदींवरचा विश्वास वृत्तपत्रांच्या मथळ्यातून जन्माला आलेला नाही

पीएम मोदी म्हणाले की ज्यांना अहंकार आहे ते गैरसमजात आहेत. मोदींना वाईट म्हणून मार्ग सापडेल असे त्यांना वाटते. पण वृत्तपत्रांच्या मथळ्यांवर मोदींचा भरवसा नाही.

मी माझे आयुष्य आणि प्रत्येक क्षण देशासाठी खर्ची केला आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर सभागृहात मोदी-मोदींच्या घोषणा देण्यात आल्या.

मागासलेल्या-आदिवासींच्या घरापर्यंत वीज-पाणी पोहोचेले

140 कोटी देशवासी हे माझे सुरक्षेचे कवच आहेत. अनेक दशके देशातील मागास आणि आदिवासींना असेच सोडले गेले, मात्र, 2014 नंतर या लोकांना गरीब कल्याण योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळाला. आज आदिवासी वस्त्यांमध्ये नळांद्वारे पाणी पोहोचत आहे. त्यांच्या घरापर्यंत वीज पोहोचत आहे.

हार्वर्ड अभ्यासाबाबत मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

काही लोकांना येथे हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ आहे. कोरोनामध्ये काँग्रेसने भारताच्या विनाशावर हार्वर्डमध्ये चर्चा होईल असे म्हटले होते. 

कालही याबद्दल चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत हार्वर्डमध्ये खूप चांगला अभ्यास केला गेला आहे आणि तो विषय आहे 'The Rise & Decline of India's Congress Party.' मला खात्री आहे की, भविष्यात काँग्रेसच्या विनाशावर आणि अधिपननावर जगभारात अभ्यास होईल. 

9 वर्षात देशाला 70 विमानतळ दिले

पीएम मोदी म्हणाले की, आज जागतिक स्तरावरील महामार्ग भारतात बनवले जात आहेत. पूर्वीची रेल्वेची ओळख म्हणजे धडपड आणि सुस्तपणा होता. आज रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. देश आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे.

रेल्वे आणि विमानतळांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. देशाची प्रगती करायची असेल तर, त्याला आधुनिकतेच्या मार्गावर न्यावे लागेल. भाजपने 9 वर्षात देशाला 70 विमानतळं दिल्या मोदींनी यावेळी सांगितले.