esakal | बंगाली लोकांमध्ये प्रगतीसाठीची आत्मशक्ती; नारी सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi In Pashchim bangal

मोदींनी या भाषणात सरकारने महिलांसाठी केलेल्या कामाचा उहापोह केला तसेच बंगालच्या विकासासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखाही त्यांनी मांडला.

बंगाली लोकांमध्ये प्रगतीसाठीची आत्मशक्ती; नारी सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे दुर्गा पुजेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. व्हिडीओ कॉन्फ्ररंसिंगद्वारे त्यांनी बंगालच्या जनतेशी संवाद साधला. त्यांनी या भाषणात सरकारने महिलांसाठी केलेल्या कामाचा उहापोह केला तसेच बंगालच्या विकासासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखाही त्यांनी मांडला. दरम्यानच, येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी हा इव्हेंट करत आहेत, अशी टीका तृणमूल काँग्रेसने केली आहे. 

हेही वाचा - PM मोदी पहिल्यांदाच दुर्गा पुजेत सहभागी, तृणमूलची भाजपवर टीका

कोलकाताच्या सॉल्ट लेकमध्ये पंतप्रधान मोदींनी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या एका सांस्कृतिक केंद्राद्वारे स्थापन केलेल्या दुर्गा पुजेच्या मंडळाचे उद्घाटन केले. याबाबत मोदींनी काल ट्विट करुन माहिती दिली होती की ते सकाळी दहा वाजता या समारंभात सामिल होतील. मोदी म्हणाले की, जेंव्हा भक्ती आणि आस्था अपरंपार असते, आई दुर्गेचा आशीर्वाद असतो तेंव्हा स्थान, स्थिती, परिस्थितीपासून पुढे जाऊन संपूर्ण देशच बंगालमय होऊन जातो. दुर्गा पुजेचं पर्व म्हणजे भारताच्या एकतेचं आणि अखंडतेचं पर्व आहे. 

पुढे बंगाली लोकांचे कौतुक करत त्यांनी म्हटलं की, बंगालच्या लोकांमध्ये एक अशी आत्मशक्ती ज्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची संधी प्राप्त करतात. बंगालच्या लोकांनी देशाला  प्रगतीच्या मार्गावर नेलं आहे. आजदेखील ते देशाला प्रगतीपथावर नेत आहेत आणि मला विश्वास आहे की भविष्यात देखील बंगालचे लोक देशाचा सन्मान याचप्रकारे वाढवत राहतील. 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने केलेल्या कामाचा उहापोह करताना त्यांनी म्हटलं की, 22 कोटी महिलांचे बँक खाते उघडणे असो किंवा मुद्रा योजने अंतर्गत कोट्यवधी महिलांना सहजतेने कर्ज उपलब्ध करुन देणे असो. बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान असो किंवा तीन तलाकच्या विरोधात कायदा बनवणे असो. देशातील नारी शक्तीला सशक्त करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम बंगालच्या विकासासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत 30 लाख गरीब लोकांसाठी घरे बांधली गेली आहेत. प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 90 लाखाहून अधिक गॅस कनेक्शन मोफत देण्यात आले आहेत. 

हेही वाचा - Bihar Election : बिहारला मोफत कोरोना लस, 19 लाख रोजगार; भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

ही बंगालचीच माती होती जिने स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वदेशीला एक संकल्प बनवण्याचे काम केलं होतं. बंगालच्या मातीतूनच गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि बंकिम चंद्र चॅटर्जी यांनी 'आत्मनिर्भर किसान और आत्मनिर्भर जीवन' असा संदेश दिला होता. यावेळी आपण सगळेच कोरोना संकटाच्या दरम्यानच दुर्गा पुजेचा समारंभ साजरा करत आहोत. हे आयोजन भलेही सीमित स्वरुपात आहे मात्र या उत्सवातील रंग, उल्हास, आनंदाला मात्र कसलीही सीमा नाहीये,  हीच तर बंगालची खासीयत आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आई दुर्गेच्या पुजेसह आपण सोशल डिस्टंन्सिग, मास्कचा वापर या सर्व नियमांचे पालन प्रामाणिकपणे कराल, असंही आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा - 'आत्मनिर्भर भारत'; अँटी-टँक गाइडेड मिसाइल 'नाग'ची चाचणी यशस्वी

राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की भाजपा या संधींचा सर्वांत जास्त फायदा घेऊ इच्छित आहे. पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांत मोठ्या सणसमारंभामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित राहून या संधीचा फायदा घेऊ पाहत आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी या कार्यक्रमात मंचावर अनेक कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केलं. आजपासूनच पाच दिवसीय दुर्गा पुजेचा समारंभ सुरु होतो. हा मोठा सण म्हणून बंगालमध्ये साजरा केला जातो. दुर्गा पूजा ही बंगाली समाजात महत्त्वपूर्ण मानली जाते. मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता शहरामध्ये 200 हून अधिक पूजेच्या मंडळांचे उद्धाटन केले आहे. 

loading image