

PM Modi: Congress Broke Vande Mataram Under Nehru
Esakal
वंदे मातरम् ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत आज १० तास चर्चा होणार आहे. या चर्चेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाली. वंदे मातरमचे तुकडे तुकडे होण्याला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. काँग्रेसनं मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले आणि वंदे मातरमचेही तुकडे केले. हे फक्त तुष्टीकरणासाठी केलं गेलं. त्या काँग्रेसचं धोरण आजही जसंच्या तसंच असल्याचंही मोदींनी म्हटलं.