

PM Modi to Attend Prerna Sthal Inauguration in Baramati
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात उभारण्यात येत असलेल्या प्रेरणास्थळ या मेडिटेशन सेंटरचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजी बारामतीत आयोजित करण्यात आला असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.