
PM Modi Praises RSS Work During Centenary Coin and Stamp Launch
Esakal
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष पोस्ट तिकीट आणि नाणे जारी केलंय. यावेळी पंतप्रधान मोदींनी आरएसएसचं कौतुकही केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आरएसएसचा १०० वर्षांचा प्रवास हा त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्र निर्मिती आणि शिस्त याचं असामान्य असं उदाहरण आहे. आम्हाला आरएसएसच्या शताब्दी वर्षाचे साक्षीदार होता आलं हे आमच्या स्वयंसेवकांच्या पिढीचं भाग्य आहे. स्थापनेपासूनच आरएसएसने राष्ट्रनिर्मिती हेच लक्ष्य ठेवलंय.