जवळच्या लोकांची संपत्ती वाढवण्याचे काम सुरु; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

कोरोना काळात अब्जाधीश वाढले! : ‘ऑक्सफॅम’च्या अहवालातील वास्तव; ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात मात्र घट
Narendra Modi Rahul Gandhi
Narendra Modi Rahul Gandhiesakal

नवी दिल्ली : भारतात एकाच वेळी अब्जाधीशांची आणि गरिबांची संख्या वाढल्याचे जळजळीत वास्तव ‘ऑक्सफॅम इंडिया’(Oxfam India)च्या ताज्या ‘इनइक्वॅलिटी किल्स’ (Inequality kills)या अहवालातून समोर आले आहे. कोरोना संसर्गाच्या(corona) काळात देशात ८४ टक्के कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे, तर अब्जाधीशांची संख्या १०२ वरून १४२ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे .भारतात उत्पन्न विषमता आणि गरीब श्रीमंतांमधील दरी वाढली वाढली असून मार्च २०२० ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत अब्जाधीशांची संपत्ती २३.१४ लाख कोटी रुपयांवरून दुप्पट म्हणजे ५३.१६ लाख कोटी रुपये झाली. तर ४.६ कोटींहून अधिक भारतीय कुटुंब कोरोना काळात म्हणजेच २०२० मध्ये गरिबीच्या खाईत ढकलले गेले असल्याचे हा अहवाल म्हणतो. या अहवालानुसार देशातील एकूण गरिबांपैकी ५० टक्के गरिबांकडे फक्त ६ टक्के संपत्ती आहे.

Narendra Modi Rahul Gandhi
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होणार आज मतदान

‘ऑक्सफॅम’ ही गरीबी निर्मूलनाच्या मुद्द्यावर काम करणारी आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था(International Social Organization) असून या संस्थेचा आर्थिक विषमतेवर आधारित ‘इनइक्वॅलिटी किल्स’ हा अहवाल रविवारी प्रकाशित झाला. यात भारतातील विषमतेकडेही लक्ष वेधण्यात आले. देशातील सर्वांत श्रीमंत १०० व्यक्तींची एकत्रित संपत्ती ५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर ९८ श्रीमंत भारतीयांकडे ४९.२७ लाख कोटी रुपयांची संपत्ती एकवटली आहे, जी ५५.२ कोटी गरीब भारतीयांच्या एकत्रित संपत्तीएवढी म्हणता येईल.

Narendra Modi Rahul Gandhi
१८ वर्षांच्या संसारानंतर रजनीकांत यांच्या मुलीचा धनुषशी घटस्फोट

या ९८ टक्के अब्जाधीशांच्या संपत्तीवर चार टक्के कर आकारला तर, त्यातून वसूल होणाऱ्या रकमेतून देशातील माध्यान्ह भोजन योजना १७ वर्षांपर्यंत किंवा सर्व शिक्षा अभियान सहा वर्षांपर्यंत सुरू ठेवता येईल. एवढेच नव्हे तर, या ९८ श्रीमंतांवर एक टक्के संपत्तीकर आकारला तर आयुष्यमान भारत’ योजनेचा सात वर्षांहून अधिक काळासाठीचा खर्च भागवता येईल, किंवा १० टक्के श्रीमंतांवर एक टक्का संपती कर आकारणीतून १७.७ लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर मिळू शकतील, असेही हा अहवाल म्हणतो. कोरोनाने भारताला विळखा घातल्यानंतर आरोग्य विभागाच्या अंदाज पत्रकात १० टक्क्यांची घट आढळून आल्याचे २०२०-२१ च्या सुधारित अंदाजातून दिसते. तर, याच काळात अब्जाधीशांचा नफा विक्रमी पातळीवर वाढला आणि त्यांची संख्या १०२ वरून १४२ झाली, असेही निरीक्षण ‘ऑक्सफॅम’च्या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

Narendra Modi Rahul Gandhi
१८ वर्षांच्या संसारानंतर रजनीकांत यांच्या मुलीचा धनुषशी घटस्फोट

राहुल गांधींची कोपरखळी!

‘ऑक्सफॅम’च्या अहवालाच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधींनी(rahul gandhi ) पंतप्रधान नरेंद्र मोदींना(pm narendra modi) कोपरखळी लगाविण्याची संधी साधली असून जागतिक आर्थिक मंचावर या विषमतेची चर्चा व्हायला हवी, असे म्हटले आहे. आपल्या मित्रांसाठी पंतप्रधान संपत्तीची शक्ती वाढवत निघाले आहेत आणि जनतेला कर, बेरोजगारीतून(Unemployment) दुबळे करत आहेत. जागतिक आर्थिक मंचावर या आकड्यांची कधी चर्चा होईल. ती व्हायलाच हवी, असे ट्विट राहुल गांधींनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com