esakal | पंतप्रधान मोदींच्या काकूचं कोरोनानं निधन
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

पंतप्रधान मोदींच्या काकूचं कोरोनानं निधन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुलती नर्मदाबेन मोदी याचं मंगळवारी कोरोनामुळं निधन झालं, त्या ८० वर्षांच्या होत्या. अहमदाबादमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अनेक प्रयत्नांनंतरही डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. नर्मदाबेन या आपल्या मुलांसह शहरातील न्यू रानीप भागात राहत होत्या. पंतप्रधान मोंदींचे छोटे भाऊ प्रल्हाद मोदींनी ही माहिती दिली.

हेही वाचा: लस टोचून घेण्यासाठी सरकार तरुणांना देतंय पैसे; जाणून घ्या काय आहे प्रकार?

पीटीआयशी बोलताना प्रल्हाद मोदी म्हणाले, "कोरोनाची लागण झाल्याने आमच्या काकूची प्रकृती बिघडल्याने त्यांना दहा दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी रुग्णालयात उपचारांदरम्यान शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या काकूचे पती जगजीवनदास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वडील दमोदरदास यांचे भाऊ होते. जगजीवनदास यांचा अनेक वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा: "आधी रक्तदान करा, मगच लस घ्या"; सरकारचं आवाहन

दरम्यान, गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासात १४,३५२ नवी प्रकरणं समोर आली आहेत. तर १७० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७,८०३ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

loading image