esakal | लस टोचून घेण्यासाठी सरकार तरुणांना देतंय पैसे; जाणून घ्या काय आहे प्रकार?
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

लस टोचून घेण्यासाठी सरकार तरुणांना देतंय पैसे; जाणून घ्या काय आहे प्रकार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वॉशिंग्टन : सध्या जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं असून जवळपास सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहिमाही सुरु झाल्या आहेत. या जीवघेण्या आजारापासून बचावासाठी लोक रांगा लावून लस टोचून घेत आहेत. मात्र, अमेरिकेतील एक असं राज्य आहे, जिथल्या सरकारला आपल्या राज्यातील तरुणांची भलतीच काळजी सतावत आहे. इथल्या तरुणांनी लस टोचून घ्यावी यासाठी इथलं सरकार तरुणांना बक्षिस म्हणून रोख रक्कम देण्याच्या विचारात आहे.

हेही वाचा: "आधी रक्तदान करा, मगच लस घ्या"; सरकारचं आवाहन

अमेरिकेतील वेस्ट वर्जिनिया या राज्यातील ही स्थिती आहे. या राज्याचं सरकार १६ ते ३५ वयोगटातील तरुणांना लस टोचून घेण्यासाठी १०० अमेरिकन डॉलरचा सेविंग बॉण्ड देणार आहे. राज्याचे प्रशासकीय अधिकारी जिम जस्टिस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. ते म्हणाले, "राज्यातील तरुणांना लवकरात लवकर लस टोचून घेण्यासाठी आमची ही योजना प्रेरणा ठरेल आणि यामुळे लसीकरणाचा उद्देश साध्य होईल"

हेही वाचा: ४० बड्या अमेरिकन कंपन्यांचा भारतासाठी मदतीचा हात; बायडन म्हणाले...

बीबीसीच्या वृत्तानुसार, वेस्ट वर्जिनिया हे राज्य अमेरिकेतील इतर राज्यांच्या तुलनेत लसीकरणात आघाडीवर आहे. पण गेल्या काही आठवड्यांपासून इथला लसीकरणाचा वेग मंदावला आहे. सध्या या राज्यातील तरुण वर्ग हा लस घेण्याबाबत जास्त साशंक आहे. काही अभ्यासांमध्ये देखील हे दिसून आलंय की, तरुण वर्गामध्ये ज्येष्ठांपेक्षा लसी घेण्याबाबत इच्छूक नाहीत.

हेही वाचा: ठरलं! रशियाची बहुचर्चित स्पुटनिक लस 'या' दिवशी होणार भारतात दाखल

सीएनएनच्या वृत्तानुसार, वेस्ट वर्जिनिया राज्याबाबत चांगली गोष्ट ही आहे की, या राज्यातील ५२ टक्के लोकांनी अर्थात १.५ मिलियन लोकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या राज्याचं अमेरिकेतील इतर राज्यांच्या तुलनेत लसीकरणाचं प्रमाण सर्वाधिक होतं.

loading image