PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

Social Media Memes: सोलश मीडियावर कायमच लक्षे ठेवून असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, ही पोस्ट गमतीने घेत याला भन्नाट उत्तर दिले आहे.
PM Modi's Meme Video Goes Viral On Social Media
PM Modi's Meme Video Goes Viral On Social MediaEsakal

सध्या देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अशात सोशल मीडियावर आपल्याला आवडत नसलेले राजकीय नेते आणि पक्षांना युजर्स मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल करणारी पोस्ट एका एक्स युजरने नुकतीच केली आहे. या पोस्टमध्ये युजरने, "मला माहित आहे की हा व्हिडिओ पोस्ट केल्याने 'हुकूमशहा' मला अटक करणार नाही," असे कॅप्शन देत एक व्हिडिओ अपलोड केला आहे. (PM Modi's Meme Video Goes Viral On Social Media)

सोलश मीडियावर कायमच लक्षे ठेवून असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, ही पोस्ट गमतीने घेत याला भन्नाट उत्तर दिले आहे.

पंतप्रधान ही पोस्ट रिपोस्ट करत म्हणाले, "तुम्हा सर्वांप्रमाणे स्वतःला नाचताना पाहून मलाही आनंद झाला. 😀😀😀 पीक पोल सीझनमध्ये अशी सर्जनशीलता खरोखरच आनंददायी आहे!" आणि पुढे त्यांनी याला #PollHumour असा हॅशटॅग वापरला आहे.

PM Modi's Meme Video Goes Viral On Social Media
Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

दरम्यान हा व्हिडिओ एडिट करून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात आले आहे. तर दुसरीकडे याच्या मूळ व्हिडिओमध्ये अमेरिकन रॅपर लिल याटी स्टेजवर प्रवेश करताना दिसत आहे. 21 जून 2022 रोजी YouTube वर पोस्ट केलेला व्हिडिओ, हिटलर आणि DC सुपरव्हिलन जोकरसह प्रसिद्ध व्यक्तींसह लिल याटीच्या जागी Sora AI वापरत असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय मेम टेम्पलेट बनला आहे.

PM Modi's Meme Video Goes Viral On Social Media
Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

काही दिवसांपूर्वी, दोन एक्स युजर्सनी त्यांच्या हँडलवर ममता बॅनर्जींचा असाच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यानंतर त्यांच्यावर CrPC च्या कलम 149 अंतर्गत कोलकाता पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाकडून नोटिसा मिळाल्या होत्या.

भारतातील निवडणुका कायमच विनोद आणि व्यंगचित्राने फुललेल्या असतात. सुरुवातीला व्यंगचित्रांच्या माध्यमातून आणि आता सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना नागरिक लक्ष्य करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com