Rakesh Tikait: मोदींना राष्ट्रपती व्हायचयं; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा खळबळजनक दावा

2024 च्या लोकसभा निवडणुकीला आता फक्त एक वर्ष उरले आहे.
Rakesh Tikait
Rakesh TikaitSakal

Rakesh Tikait: 2024 च्या लोकसभा निवडणुकीला आता फक्त एक वर्ष उरले आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत हेही कुस्तीगीरांच्या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय झाले असून सरकारवर निशाणा साधत आहेत.

राकेश टिकैत यांनी एबीपी न्यूजच्या पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता ज्यामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनासोबतच 2024 च्या निवडणुकीवरही मोकळेपणाने भाष्य केले.

राकेश टिकैत यांनी पीएम मोदींबद्दल मोठा दावा केला आहे. राकेश टिकैत म्हणाले की, 2024 मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील.

पण त्याचवेळी पंतप्रधान मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत आणि मध्येच पायउतार होतील, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी पद का सोडणार? टिकैत यांनी सांगितले कारण

राकेश टिकैत म्हणाले की, पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यातच पद सोडतील. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्ही त्यांना हटवाल का, तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही त्यांना हटवाणार नाही, पंतप्रधान मोदी स्वत:च पदारुन पायउतार होतील कारण त्यांना देशाचे राष्ट्रपतीही व्हायचे आहे.

2024 मध्ये पंतप्रधान कोण व्हावे, राहुल गांधी की नरेंद्र मोदी या प्रश्नावर टिकैत म्हणाले की, या दोघांपैकी जनता ज्याला निवडून देईल तो देशाचा पुढचा पंतप्रधान होईल. ते पुढे म्हणाले, ज्याने यंत्रणा ताब्यात घेतली तोच होईल.

Rakesh Tikait
Finances Report: PM मोदींच्या गुजरातवर 3.40 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा, कॅगने सरकारला दिला इशारा

उत्तर प्रदेशातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 100 हून अधिक जागा यंत्रणांनी जिंकून दिल्या आहेत असा दावा टिकैत यांनी केला.

राकेश टिकैत यांनी देशाच्या पुढील पंतप्रधानपदासाठी आपली निवड उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना असेल असे त्यांनी सांगितले.

पीएम मोदींनंतर कोण, या प्रश्नावर ते म्हणाले की, योगी आदित्यनाथ. सीएम योगींना काम करू दिले जात नाही, असेही ते म्हणाले. वरून लोक त्यांच्या कामात अडथळा आणत असल्याचा दावा त्यांनी केला.

Rakesh Tikait
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com