
अयोध्येचा ऐतिहासिक निकालाकडे देशवासिंयांचे लक्ष लागले आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी.
नवी दिल्ली : अयोध्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येत आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय हा कोणाचा विजय किंवा पराभव ठरणार नाही. देशवासीयांना माझे आवाहन आहे की, या निर्णयाने भारताची शांतता, ऐक्य आणि सद्भावनेच्या महान परंपरेला आणखी दृढ करणे हे आपल्या सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अयोध्या पर सुप्रीम कोर्ट का जो भी फैसला आएगा, वो किसी की हार-जीत नहीं होगा। देशवासियों से मेरी अपील है कि हम सब की यह प्राथमिकता रहे कि ये फैसला भारत की शांति, एकता और सद्भावना की महान परंपरा को और बल दे।
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2019
अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनवादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय उद्या (ता. 9) ऐतिहासिक निकाल देणार आहे. सकाळी साडेदहापासून ही सुनावणी सुरू होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ हा निकाल देईल. सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. उद्या प्रामुख्याने निकालाचे सारांशात्मक टिप्पण वाचून दाखविण्यात येईल. यामध्ये न्यायालयातर्फे निकालातील सर्वपैलू स्पष्ट केले जातील. या खटल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अयोध्येच्या खटल्यात सहभागी असलेल्या हिंदू संघटना त्याचप्रमाणे मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेऊन संयुक्त बैठकांद्वारे शांततेचे आवाहन केले आहे.
मोदींनी म्हटले आहे, की अयोध्येचा ऐतिहासिक निकालाकडे देशवासिंयांचे लक्ष लागले आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी. सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही महिन्यापासून अयोध्या प्रकरणावर निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. शनिवारी येणाऱ्या कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे. कोर्टाकडून येणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, आणि एकता कायम राखणं ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. या परंपरेला आणखी बळ द्या.