भगवत गीता आणि पंतप्रधान मोदींचा फोटो घेऊन अवकाशात जाणार सॅटेलाईट

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 February 2021

फेब्रवारीमध्ये लॉन्च केली जाणारी एक सॅटेलाईट स्वत:सोबत भगवद गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो घेऊन हवेत उड्डाण करणार आहे

नवी दिल्ली- फेब्रवारीमध्ये लॉन्च केली जाणारी एक सॅटेलाईट स्वत:सोबत भगवद गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो घेऊन हवेत उड्डाण करणार आहे.  पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसोबत त्यांचे नावही लिहिण्यात येणार आहे. या नॅनो सॅटेलाईटचे नाव भारताच्या अवकाश कार्यक्रमाला आकार देणारे महान शास्त्रज्ञ सतीश धवन यांच्या नावावर दिले गेले आहे. खासगी क्षेत्राचे हे पहिले सॅटेलाईट असेल जे आपल्या मिशनमध्ये भगवत गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य 25 हजार लोकांचे नाव घेऊन अवकाशात जाणार आहे. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल  (PSLV) माध्यमातून याला लॉन्च केले जाईल. 

'भाजप आता नेपाळ-श्रीलंकेतही सरकार स्थापन करणार; अमित शहा यांचा मास्टरप्लॅन...

सॅटेलाईटला स्पेसकिड्स इंडियाने विकसित केले आहे. ही एक विद्यार्थ्यांच्या अवकाश विज्ञानातील सहभागाला प्रोत्साहन देणारी संस्था आहे.  सॅटेलाईट तीन अन्य पेलोड्स घेऊन अवकाशात जाणार आहे. ज्यात अवकाश विकिरण, मॅग्नोटोस्फीयरचे अध्ययण आणि कमी उर्जेत संचार नेटवर्कचे प्रदर्शन याचा समावेश असेल.  

स्पेसकिड्स इंडियाचे संस्थापक आणि सीईओ डॉ केसन म्हणाले की, आमच्यामध्ये खूप उत्साह आहे. अवकाशात तैनात होणारी ही आमची पहिली सॅटेलाईट असेल. मिशनला अंतिम स्वरुप दिल्यानंतर आम्ही लोकांकडून अवकाशात पाठवण्यासाठी नावं पाठवण्यास सांगीतलं होतं. एका आठवड्याच्या काळात आम्हाला 25 हजार नावे आली. यातील 1 हजार नावे भारताबाहेरील लोकांनी पाठवली आहेत. ज्या लोकांची नावे पाठवण्यात आली, त्यांना बोर्डिंग पासही दिला जाईल.  

नोकियातील अखेरच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी काय केलं? 

केसन यांनी सांगितलं की, अवकाशात भगवत गीता पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीही अवकाशात बायबल सारखे पुस्तके पाठवण्यात आले आहेत. टॉप पॅनलमध्ये आम्ही पंतप्रधान मोदी यांचे नाव आणि त्यांचा फोटो जोडला आहे. या सॅटेलाईटला पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आले आहे. सॅटेलाईटवर डॉ. के सिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर उमामहेश्वन यांचेही नाव लिहिण्यात आले आहे. 

रविवारी सॅटेलाईट श्रीहरिकोटाच्या स्पेसपोर्टमधून पाठवलं जाईल. या सॅटेलाईटचे प्रक्षेपण इस्त्रो आपल्या दोन ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण 'पीएसएलवी सी-51'सोबत करेल. भारताने मागील वर्षी स्पेस सेक्टर खासगी क्षेत्रांसाठी खुले केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi bhagwat gita satellite during launching