Coronavirus : 'जनता कर्फ्यू'नंतर पंतप्रधानांचे नवे आवाहन; वाचा सविस्तर!

वृत्तसंस्था
रविवार, 22 मार्च 2020

एका मोठ्या युद्धाच्या प्रारंभाला करतानाचा हा नाद आहे. या संकल्पाद्वारे कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपण स्वत:ला बंधन घातले. या लढाईत सहभागी झालेल्या प्रत्येक भारतीयाचे धन्यवाद.

Coronavirus : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२२) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याला सर्व भारतीयांनी उदंड प्रतिसाद दिला. कोरोना विरुद्धच्या लढाईत पुन्हा एकदा भारतीयांची एकजूट दिसून आली. कोरोनाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जनता कर्फ्यू काळातही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकारी, पोलीस, माध्यम प्रतिनिधी तसेच अनेकजण आपली सेवा बजावत होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सायंकाळी ५ वाजता देशभरातील नागरिकांनी घराबाहेर येत त्या सर्वांना सलाम ठोकला. थाळीनाद, घंटानाद, शंखनाद, वंदे मातरम् आणि भारत माता की जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. आपण केलेल्या आवाहनाला भारतीयांना भरघोस पाठिंबा दर्शविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे सर्व देशवासियांचे आभार मानले.

- Videos : 'वी आर वन, वी हॅव वॉन'; कोरोना योद्ध्यांना दिग्गजांचे अभिवादन!

मोदी म्हणाले, 'एका मोठ्या युद्धाच्या प्रारंभाला करतानाचा हा नाद आहे. या संकल्पाद्वारे कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपण स्वत:ला बंधन घातले. या लढाईत सहभागी झालेल्या प्रत्येक भारतीयाचे धन्यवाद.'

- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमकीत 17 जवान हुतात्मा

ते पुढे म्हणाले, 'कोरोनाविरुद्धच्या लढाईला आता कुठे सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे पालन करावे. एका मोठ्या युद्धासाठी आपण एकमेकांपासून दूर राहून आपलं योगदान देऊया.'

- बुलाती है मगर जाने का नै, ये दुनिया है, इधर जाने का नै!

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi calls to Citizens of India for social distancing after public curfew