Videos : 'वी आर वन, वी हॅव वॉन'; कोरोना योद्ध्यांना दिग्गजांचे अभिवादन!

टीम ई-सकाळ
Sunday, 22 March 2020

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपल्या बंगल्याच्या गच्चीवर जाऊन या आवाहनाला पाठिंबा दिला.

Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात रविवारी (ता.२२) 'जनता कर्फ्यू' घोषित केला होता. सकाळी ७ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व भारतीयांनी घरात बसून पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाचे पालन केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसभर कोरोना विषाणूचा धोका पत्करत डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस, माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि इतर अनेकांनी आपली सेवा बजावली. या सर्व कोरोना योद्ध्यांचे टाळ्या आणि थाळी वाजवून त्यांचे आभार मानण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते.

- Coronavirus: महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा; मध्यरात्रीपासून अंमलबजावणी 

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतला मोठा निर्णय!

सामान्य नागरिकांप्रमाणे देशातील सर्व महत्त्वाच्या नेतेमंडळींनीही घराबाहेर येत कोरोना योद्ध्यांप्रति आपली भावना व्यक्त केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या कुटुंबीय, सहकाऱ्यांसोबत टाळ्या, घंटा वाजवत प्रतिसाद दिला. 

- बुलाती है मगर जाने का नै, ये दुनिया है, इधर जाने का नै!

तसेच बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपल्या बंगल्याच्या गच्चीवर जाऊन या आवाहनाला पाठिंबा दिला. तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असलेल्या अल्लू अर्जुननेही आपल्या कुटुंबीय आणि घरातील सहकाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना अभिवादन केले.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political leaders and bollywood stars clap to Thank those fighting at Forefront Against Coronavirus