

Modi Refers to Nehru Statement on War and Inflation
Esakal
Modi Responds to Criticism Over Gas Shortage आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात इंधन तेलासह एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गॅससाठी रांगा लागत आहेत. तर सरकारने गॅस बूकिंगच्या नियमातसुद्धा बदल केले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध आणि भारतातील एलपीजी संकटाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलंय. आसाममध्ये किसान सन्मान निधीचा हफ्ता जारी करताना ते बोलत होते. शेतीला बाहेरच्या संकटापासून वाचवण्यासाठी आम्ही आत्मनिर्भरतेला प्रोत्सान दिल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.