उपराष्ट्रपती धनखड यांच्या निवासस्थानी जावून पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन

PM Narendra Modi, Jagdeep Dhankhar
PM Narendra Modi, Jagdeep Dhankhar

नवी दिल्ली - भारताच्या 16 व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड हे अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजयी झालेत. 71 वर्षीय धनखड यांना पाहिल्या पसंतीची तब्बल 528 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 मते बाद झाली. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे अभिनंदन केलं. (PM Narendra Modi, congratulate Jagdeep Dhankhar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी धनखड यांचे अभिनंदन केलं. 1974 पासून सुरू असलेल्या धनखड यांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रवास उपराष्ट्रपतीपदापर्यंत येऊन ठेपला आहे. धनकड यांच्या रूपाने आणखी एका ओबीसी नेत्याला उपराष्ट्रपतीपदाचा मान मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह भाजप नेत्यांनी जगदीप धनखड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलं.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर जगदीप धनखड यांच्या मुळ गावी झुंझुनू येथील स्थानिकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. येत्या 11 ऑगस्ट रोजी (बुधवारी) उपराष्ट्रपती धनखड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ घेतील. त्यानंतर ते राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com