मोदींनी केले देशात १०० ड्रोनचे उद्घाटन; स्टार्टअप्सना दिले प्रोत्साहन

मोदी यांनी देशाच्या विविध भागात १०० किसान ड्रोनचे उद्घाटन केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modiटिम ई सकाळ
Updated on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारला भारतातील विविध शहरे आणि गावांमध्ये शेतात कीटकनाशक फवारणीसाठी 100 किसान ड्रोनचे (Drone) उद्घाटन केले.या प्रसंगी नरेंद्र मोदी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या स्टार्टअप्सना सरकारच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. आणि भारत लवकरच या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व (Global Leader) म्हणून उदयास येईल,असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले, "भारतात ड्रोन मार्केटची एक नवीन इकोसिस्टम (Ecosystem) विकसित होत आहे. देशात 100 हून अधिक ड्रोन स्टार्ट-अप (Start-up) सध्या कार्यरत आहेत आणि लवकरच त्यांची संख्या हजारोंपर्यंत वाढेल, ज्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. या करीता भारत साक्षीदार होण्यास तयार आहे”

PM Narendra Modi
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला एकमेव किल्ला 'बेतुल'

ड्रोन ही सैन्याशी संबंधित यंत्रणा आहे,असे वा़टायचे परंतु आता 21 व्या शतकात ड्रोनच्या सहाय्याने आधुनिक कृषी व्यवस्थेच्या दिशेने एक नवीन अध्याय सुरू झाल्याचे मोदी म्हणाले.शेतकर्‍यांना मदत करण्याच्या विशेष मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागात १०० किसान ड्रोनला झेंडा दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com