PM Narendra Modi : "नरेंद्र मोदी स्वतंत्र भारतातले सर्वात पुरोगामी व धर्मनिरपेक्ष पंतप्रधान"

भारतातले सर्व समुदाय स्वातंत्र्य अनुभवत आहेत आणि त्यांना जात, वर्ण, धर्म पंथ, कोणत्याही भेदभावाशिवाय समान संधी मिळत आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal

ऑस्ट्रेलियामधल्या मेलबर्न इथं आयोजित विश्व सद्भावना कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातले सर्वात पुरोगामी व धर्मनिरपेक्ष पंतप्रधान आहेत, अशा शब्दांत त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

NID फाऊंडेशनचे मुख्य सतनाम सिंग संधू यांनी रविवारी झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी शीख समुदायासाठी केलेलं काम व योगदानावर आधारीत 'हार्टफेल्ट लेगसी टू द फेथ' हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आलं आहे.

PM Narendra Modi
Narendra Modi Visit : ३६ तासांत PM मोदी ५,३०० किलोमीटर अंतर पार करत ७ शहरांचा दौरा करणार

संधू पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत गेल्या नऊ वर्षांमध्ये मोठ्या गतीने एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर जात आहे. सध्या भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. इतर अनेक राष्ट्रांप्रमाणे, भारतातले सर्व समुदाय स्वातंत्र्य अनुभवत आहेत आणि त्यांना जात, वर्ण, धर्म पंथ, कोणत्याही भेदभावाशिवाय समान संधी मिळत आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांना सुरक्षितही वाटत आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com