esakal | PM मोदींकडून राष्ट्रीय आरोग्य मिशनची घोषणा; जाणून घ्या नेमका काय आहे उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

health

राष्ट्रीय आरोग्य मिशन (national digital health mission) ची घोषणा

PM मोदींकडून राष्ट्रीय आरोग्य मिशनची घोषणा; जाणून घ्या नेमका काय आहे उपक्रम

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन सलग सातव्यांदा देशवासियांना संबोधित केले. ते आपल्या भाषणात नेमकी काय घोषणा करणार याची उत्सुकता होती. अनेक मुद्यांवर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन (national digital health mission) ची घोषणा केली. या माध्यमातून भारतातील आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय.  

ध्वजावंदनच्या वेळी PM मोदींसोबत दिसलेल्या लष्करी महिला अधिकारी कोण माहितेय का?

ते म्हणाले की, 'राष्ट्रीय आरोग्य मिशन' या नावाने देशात मोठा उपक्रम राबवण्यात येणार आहे. डिजिटल अ‍ॅपच्या माध्यमातून आरोग्यासंदर्भातील तक्रारी, चाचणी, आजारासंदर्भातील संपर्ण माहिती, कोणत्या डॉक्टरने तुम्हाला कोणते औषध दिले याची माहिती सहज उपलब्ध होईल, असे मोदींनी सांगितले. 

 74th independence day : मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

राष्ट्रीय आरोग्य मिशन कसे काम करेल 

- या उपक्रमाअंतर्गत डॉक्टरांची संपूर्ण माहिती आणि देशभरातील आरोग्यसंदर्भातील सेवेची माहिती एका अ‍ॅपवर उपलब्ध असेल.  
- हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर नागरिकांना नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर हेल्थ आयडी कार्ड प्राप्त होईल  
- यामध्ये तपासणी आणि चाचण्यांची माहिती जतन करुन ठेवणे सहज सुलभ होईल. 
 -जेव्हा तुम्ही एखाद्या रुग्णालयात जाल त्यावेळी रिपोर्टस वैगेर सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.  
- डॉक्टरांना एका युनिक आयडीच्या माध्यमातून रुग्णासंदर्भात सर्व माहिती प्राप्त होऊ शकेल.  
- संबंधित अ‍ॅपवर नोंदणी करणे ऐच्छिक असेल.