esakal | पवारांशी भेट झाल्यानंतर मोदींनी बोलविले अमित शहांना
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah, Narendra Modi

मोदींसोबत झालेल्या चर्चेत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. मोदींना पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी पत्र देत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. 

पवारांशी भेट झाल्यानंतर मोदींनी बोलविले अमित शहांना

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यातील ओला दुष्काळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आपल्या दालनात बोलविल्याने चर्चांना उधाण आले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Exclusive : शरद पवारांनी भेटीदरम्यान मोदींना दिले पत्र; पाहा...

मोदींसोबत झालेल्या चर्चेत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. मोदींना पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी पत्र देत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. 

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

मोदी आणि पवार यांच्यात आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत भेट झाली. सुमारे 45 मिनिटे यांच्यात भेट झाल्यानंतर मोदींनी अमित शहांना आपल्या दालनात बोलविले. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या तिढ्याबाबत चर्चा सुरु असताना या बैठकीकडे पाहिले जात आहे. पण, महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांविषयी माहिती दिल्याचे पवारांनी सांगितले. तसेच 30 नोव्हेंबरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मोदी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती मांडल्यानंतर मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बोलावून घेतले. या नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गंभीर चर्चा झाली.

loading image