पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली देशाची माफी

टीम ई-सकाळ
Monday, 2 September 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, देशाची माफी मागितली. ही माफी त्यांच्या कार्यकाळातील कोणत्याची चुकीसाठी नाही तर, जैन धर्मातील पर्युषण पर्वात मागण्यात येणाऱ्या माफीच्या रितीनुसार आहे. जैन धर्मात आपल्याकडून कळत-नकळत घडलेल्या चुकांची माफी पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी, संवत्सरीला मागितली जाते. मूर्तीपूजक जैन बांधवांची संवत्सरी आज (सोमवार, 2सप्टेंबर) होती. तर, स्थानकवासी जैन बांधवांची संवत्सरी उद्या (मंगळवार 3 सप्टेंबर) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात जैन रितीनुसार माफी मागितली. 

''जनसंकल्प''पूर्वीच हर्षवर्धन पाटलांच्या हातात कमळ 

काय आहे मिच्छा् मी दुक्कडं?
जैन धर्मामध्ये वर्षभर कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी पर्युषण पर्वाच्या अंतिम दिवशी म्हणजे, संवत्सरीला मागितली जाते. त्याला ''मिच्छा् मी दुक्कडं'' असे म्हटले जाते. प्राकृत भाषेतील या वाक्याचा अर्थ, मी केलेल्या चुकांबद्दल आपली माफी मागतो, असा आहे. तीर्थंकर भगवान महावीर यांनी उपदेश केलेले अलौकिक सूत्र आहे. हे सूत्र म्हणजेच चेतनेला दोषमुक्त करण्याची प्रक्रिया होय. 

उदयनराजेंचं ठरलंय! मावळा मन वळविण्यात अपयशी

काय आहे पर्युषण पर्व
भौतिक सुविधांच्या आकर्षणाने चेतना दबली जाते. चेतनाशक्तीला जागृत करण्याचे प्रयत्न पर्युषण पर्वामध्ये होतात. जैन धर्माने विशिष्ट नियम दिला आहे. मनुष्य जसजसा आपल्या चेतनेच्या जवळ जाऊ लागतो, तसतसा तणाव कमी होत जातो. परिणामी त्याचे दुःख कमी होते, विकृतीसुद्धा कमी होते. चेतनेकडे जात असताना अथवा स्थिर होत असताना दोन प्रकारच्या अडचणी येतात. एक, चेतनेकडे जाण्याचा मार्ग माहीत नसतो आणि दुसरी जुन्या सवयी आपल्याला सोडत नसतात. चेतनेकडे जाण्याचा मार्ग संसारापासून वेगळा आहे. तो आपल्या विचार आणि धारणांच्या पलीकडील आहे. तोच मार्ग भगवान महावीरांनी अवलंबला होता. हा मार्ग म्हणजेच ध्यान आणि समता. या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला स्वार्थकेंद्रित सवयी बदलाव्या लागतील. आपण पाच चांगल्या सवयींनी चेतनेचा अनुभव करू शकतो. पहिली आहे संवेदनशीलता. आपण स्वतःच्या दुःखांना दुःख समजतो, दुसऱ्यांच्या नाही. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखाचा अनुभव करणे म्हणजेच संवेदनशीलता. दुसरी आहे स्नेहशीलता. नात्यांमध्ये स्वार्थ सोडून सद्‌भाव ठेवणे ही स्नेहशीलता होय.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi michhami dukkadam jain paryushan parv delhi science center programe