No-Confidence Motion : काहींनी शेतात जाऊन फोटोशूट केलं; मोदींनी केली राहुल गांधींची नक्कल

विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालंय, काहीजण शेतात जाऊन फोटोशूट करतात.
Rahul Gandhi PM Narendra Modi
Rahul Gandhi PM Narendra ModiSakal

नवी दिल्ली : लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांच्या इंडिया आघाडीने अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. अविश्वासाच्या प्रस्तावाचा आज तिसरा दिवस आहे. राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.

"काहीजण शेतात जाऊन फोटोशूट करतात, यापूर्वीही HAL कंपनीच्या आवारात जाऊन असेच व्हिडिओ बनवले जायचे. HAL बाबतही विरोधकांनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला पण आज ही कंपनी देशाची शान आहे." असं मोदी म्हणाले आहेत.

Rahul Gandhi PM Narendra Modi
Buldhana Accident : बहिणीची 'ती' भेट ठरली शेवटची! रक्षाबंधनाच्या आधीच 3 भावांवर काळाने घातला घाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया या आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. विरोधकांच्या आघाडीने इंडियाचे तुकडे केले. तुम्हाला आघाडी स्थापन करायलासुद्धा NDA चा आधार घ्यावा लागला आहे. तर इंडिया नावाचा वापर केल्यामुळे तुम्हाला वाटतं की लोकांचा विश्वास मिळेल पण तसं होत नाही असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

काय म्हणाले मोदी?

  • देशातील गरिबी वेगाने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षामध्ये साडे तेरा कोटी लोकं गरिबी रेषेबाहेर आले आहेत. भारताची निर्याच नवे उच्चांक गाठत आहे. देशातील परकीय गुंतवणूकही वाढत आहे. आम्ही देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे काम केले आहे. 'स्वच्छ भारत'मुळे तीन लाख लोकांचे जीव वाचले. स्वच्छ भारत अभियान आणि जलजीवन मिशनचं WHO कडून अभिनंदन झालं. आपल्या संकल्पना सिद्धीपर्यंत घेऊन जाण्याचा हाच काळ आहे.

  • जे सत्य जगाला दिसतंय ते विरोधकांना का दिसत नाही? काही लोकांकडून जगात भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेले तीन दिवस विरोधकांनी अनेक अपशब्द वापरले गेले. अविश्वास आणि अहंकार विरोधकांच्या रक्तात आहे. मोदी तेरी कब्र खुलेगी असा नारा विरोधकांनी दिला.

  • विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालंय, काहीजण शेतात जाऊन फोटोशूट करतात, यापूर्वीही HAL कंपनीच्या आवारात जाऊन असेच व्हिडिओ बनवले जायचे. HAL बाबतही विरोधकांनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.

  • आम्ही डिजीटल इंडिया करण्याचं बोललो पण काही लोकं म्हणाले भारतातले लोकं अडाणी आहेत. त्यांना काही येत नाही पण आज भारत डिजीटल झाला.

  • आम्ही ज्या योजना आणल्या त्यावर विरोधकांनी टीका केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com