Buldhana Accident : बहिणीची 'ती' भेट ठरली शेवटची! रक्षाबंधनाच्या आधीच 3 भावांवर काळाने घातला घाला

Buldhana Accident news
Buldhana Accident newsesakal

Buldhana News : बहिणीला भेटून परतत असताना एका अपघातामध्ये तीन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील नांदुरा बायपास येथे ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले तिघेही झोडगा येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, उमेश विठ्ठळ कांढरकर (२३), प्रशांत किसन कांढरकर (२३) आणि नितीन किसन कांढरकर (२६) असं मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

यातील नितीन आणि प्रशांत सख्खे भाऊ असून उमेश हा त्यांचा चुलत भाऊ आहे. ते तिघेही बहिणीला भेटून अनोराबाद येथून अंबोलाकडे जात असताना मलकापूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा उड्डाणपुलाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

Buldhana Accident news
Nashik Leopard : कोंबड्याची शिकार करायला गेला बिबट्या अन् स्वत:च खुराड्यात कैद झाला

दरम्यान, रस्ता ओलांडत असताना त्यांची दुचाकी एका ट्रकवर जाऊन आदळल्याची माहिती असून ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून १५ मिनीटांनी ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात किसन कांढरकर यांनी आपल्या दोन्ही मुलांना गमावलं आहे. रक्षाबंधनाचा उत्सव जवळ आला असून रक्षाबंधनाच्या आधी या भावंडांसाठी बहिणीसोबतची शेवटची भेट ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com