Sextortion: ७२८ लोकांना अडकवलं जाळ्यात अन् घातला लाखोंचा गंडा; सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश

Sextortion : हरियाणा पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 8 जणांना अटक केली आहे. या आरोपींनी ३७ लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींनी 728 जणांना या जाळ्यात अडकवले आहे.
Sextortion
Sextortionesakal
Updated on

हरियाणामध्ये एका मोठ्या 'सेक्सटॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एक-दोन नव्हे तर सुमारे 800 लोक याचे बळी ठरले आहेत. हरियाणा पोलीस 37 लाख रुपयांच्या सेक्सटोर्शनचा तपास करत होते. या तपासादरम्यान पोलिसांना एका मोठ्या रॅकेटची माहिती मिळाली. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून हे लोक अश्लील व्हिडिओ दाखवून लोकांना ब्लॅकमेल करायचे. द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, भिवानीचे एसपी वरुण सिंगला यांनी सांगितले की, या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, हे लोक व्हॉट्सॲप कॉलद्वारे लोकांना ब्लॅकमेल करायचे. आधी ते व्हिडिओ कॉल करायचे आणि नंतर त्या व्यक्तीचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे. यानंतर त्या व्यक्तींचा चेहरा पॉर्न क्लिपमध्ये बदलायचे आणि हा व्हिडिओ पाठवून त्यांना ब्लॅकमेल करायचे. आत्तापर्यंत आरोपींनी वेगवेगळ्या राज्यातील 728 हून अधिक लोकांना असे व्हिडिओ कॉल केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Sextortion
Thane Crime: एकाच दिवशी दोन चोरींच्या घटनांनी हदरले ठाणे; वाचा संर्पूण माहीती

दोन महिन्यांपूर्वी, सेक्टर 13, भिवानी येथे राहणाऱ्या एका वृद्धाने याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्यांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला होता. फोन उचलल्यावर एका मुलीने तिचे कपडे काढायला सुरुवात केली. त्या वृध्दाने कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर काही वेळाने त्यांना एक व्हिडिओ पाठवण्यात आला ज्यामध्ये वृध्द व्यक्ती नग्न मुलीच्या जागी दिसत होता. त्यानंतर त्यांना सतत फोन येऊ लागले. फोन करून आरोपी स्वत:ला सीबीआय किंवा दिल्लीच्या गुन्हे शाखेचे अधिकारी सांगत होते. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही त्यांनी दिली.

Sextortion
Ganpat Gaikwad आणि Mahesh Gaikwad यांच्यातला गोळीबाराचा रक्तरंजित इतिहास नेमका काय?

वृद्ध व्यक्तीने आरोपींना दोन दिवसांत ३६.८४ लाख रुपये दिले. यानंतर आरोपींनी आणखी 20 लाखांची मागणी सुरू केली. त्यानंतर वृध्द व्यक्तीने संपूर्ण हकीकत घरात सांगितली. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मोबाईल फोन ट्रेस केला असता तो राजस्थानचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली. सायबर तपासणीसाठी १९ मोबाईल पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून आतापर्यंत तीन कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Sextortion
Uttar Pradesh Crime News: प्रेमी युगुलाचा करूण अंत! टोकाचा निर्णय घेत संपवलं जीवन; कुटुंबियांकडून दोघांची हत्या झाल्याचा संशय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com