Katchatheevu Island: कच्चाथीवू मुद्दा तापणार! पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, काय आहे प्रकरण?

Katchatheevu island to Sri Lanka : काँग्रेसवर टीका करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला एक नवा मुद्दा मिळाला आहे
Katchatheevu island
Katchatheevu island Esakal

नवी दिल्ली- काँग्रेसवर टीका करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला एक नवा मुद्दा मिळाला आहे. १९७० च्या दशकात काँग्रेसकडून कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरुन आता भाजप आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक्सवर पोस्ट करुन काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. (PM Narendra Modi slammed Congress for giving away the Katchatheevu island to Sri Lanka in the 1970)

पंतप्रधान मोदी म्हणालेत की, डोळे उघडणारे आणि धक्कादायक. नवी तथ्ये समोर आली आहेत. यानुसार काँग्रेसने भारताचे कच्चाथीवू (Katchatheevu) बेट श्रीलंकेला देऊन टाकले आहे. यामुळे भारतीय लोकांमध्ये संताप आहे. लोकांना आता पक्क वाटतंय की, आपण काँग्रेसवर विश्वास ठेवू शकत नाही. भारताची एकता कमकूवत करणे, एकात्मता आणि देशाच्या हिताला प्राधान्य न देणे अशी काँग्रेसची नीती राहिली आहे. गेल्या ७५ वर्षांपासून काँग्रेस हेच करत आली आहे.

Katchatheevu island
इंदिरा गांधी यांनी भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले? माहिती अधिकारातून उघड

कच्चाथीवू बेट का आलंय चर्चेत?

तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नमलाई यांनी माहिती अधिकारातून महत्त्वाची माहिती मिळवली आहे. भारताच्या किनाऱ्यापासून २० किलोमीटर दूर पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये १.९ स्क्वेर किलोमीटर क्षेत्रफळाचे एक बेट आहे. हे बेट स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होता. पण, यावर श्रीलंकेकडून दावा करण्यात आला. शिवाय श्रीलंकेच्या हवाई दलाने या बेटावर युद्धसराव देखील केला. पाल्क सामुद्रधुनीमध्ये मच्छिमारी करणाऱ्या लोकांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

Katchatheevu island
Sanjeev Balyan: मुझफ्फरनगरचे भाजप उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर हल्ला, प्रचारादरम्यान वाहनांची तोडफोड

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी बेटाला फारसं महत्वं दिलं नव्हतं. हा मुद्दा वारंवार संसदेत चर्चेला आणणे योग्य नव्हतं. त्यामुळे कोणतेही महत्त्व नसलेल्या या बेटावरील दावा मागे घेण्यास मला संकोच वाटणार नाही, असं जवाहरलाल नेहरु म्हणाले होते.

इंदिरा गांधींनी बेट श्रीलंकेला दिलं

कच्चाथीवू हे बेट ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले आहे. याठिकाणी एक चर्च आहे. शिवाय, श्रीलंकेचे मच्छिमार याठिकाणी थांबत असतात. याठिकाणी गेलेल्या भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्यात येते. १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिल्याचं सांगण्यात येतंय. यावेळी विरोधकांनी विरोध दर्शवला होता. पण, दोन्ही देशातील संबंधांच्या दृष्टीकोनातून हे बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com