नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकाचवेळी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या बाबतीत त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. आजपासून (२५ जून २०२५) नरेंद्र मोदींचा कार्यकाळ ४०७८ दिवसांचा झाला असून ते या यादीत फक्त देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या मागे आहेत.