

PM Modi to speak to nation at 830 pm
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री साडे आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. विशेष अधिवेशनात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभेत मंजूर न झालेल्या विधयेकाबाबत पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ते काय बोलणार हे स्पष्ट झालेलं नाही. विशेष अधिवेशनात महिला आरक्षणासह घटनादुरुस्ती विधेयकही होतं. मात्र महिला आरक्षण विधेयकाला बहुमत न मिळाल्यानं सरकारने इतर दोन विधेयकं मागे घेतली. याच मुद्द्यावर पंतप्रधान मोदी बाजू मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.