
370 कलम हटवल्यानंतर मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये
कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये हजेरी लावली. मोदींच्या हस्ते सुमारे 20 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा दौरा ठरवला होता.
हेही वाचा: प्रियांका गांधींनी 2 कोटीचं चित्र विकत घ्यायला भाग पाडलं; कपूर यांचा खुलासा
या प्रसंगी त्यांनी दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणाऱ्या बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याच्या उद्घाटन केले. तसेच किश्तवाड जिल्ह्यातील 850 मेगावॅट रॅटले जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली. तर 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील त्यांनी केले. ज्यामुळे कार्बन न्यूट्रल बनणारी देशातील पहिली पंचायत बनली आहे
हेही वाचा: नरेंद्र मोदी पोहोचण्याआधीच जम्मूत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, छावणीचं स्वरुप
या लोकार्पण सोहळ्यात बोलताना मोदी म्हणाले, 370 कलम काढून जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही मजबूत करण्यात आली. केंद्र सरकारच्या योजना आता येथे राबवल्या जात आहेत. त्याचा लाभ लोकांना मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नवा विकास रचला जाईल.
Web Title: Pm Narendra Modi Visited Jammu Kashmir After The Abrogation Of Articles 370
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..