...तेव्हापासून माझी आई मला एकेरी हाक मारत नाही - पंतप्रधान मोदी

आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी एक भावनिक लेख लिहिलेला आहे.
PM Narendra Modi with his mother
PM Narendra Modi with his motherSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचा आज १०० वा वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हा ब्लॉग त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. (PM Narendra Modi shares a blog about his mother)

PM Narendra Modi with his mother
भारतीय वृत्तपत्रांचं स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोठं योगदान : मोदी

हा ब्लॉग शेअर करताना आपल्या ट्वीटमध्ये मोदी (PM Narendra Modi) म्हणतात, आई हा फक्त एक शब्द नाही, तर अनेक भावनांचा मिलाप आहे. आज १८ जून रोजी, माझी आई हिराबा (PM Narendra Modi's mother Heeraben Modi) वयाच्या १०० व्या वर्षात प्रवेश करत आहे. या खास दिवशी मी माझ्या भावना, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या आईबद्दलचे काही किस्से, आईच्या काही आठवणीही सांगितल्या आहेत.

PM Narendra Modi with his mother
PHOTOS: मोदींच्या आईची शंभरी; घरी जाऊन घेतले आशिर्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लेखात आपली आई कशा पद्धतीने संबोधते, याबद्दल सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझी आई माझ्याशी गुजरातीतच बोलते. गुजरातीमध्ये एकेरी हाक मारताना 'तू' म्हणतात आणि तुम्हाला म्हणायचं असल्याचं 'तमे' म्हणतात. मी जेवढे दिवस घरी राहिलो, तेवढे दिवस मला आई 'तू' म्हणायची. पण जेव्हा मी घर सोडलं, माझा मार्ग बदलला. त्यानंतर तिने कधीही मला एकेरी हाक मारली नाही. आजही ती मला 'तमे' असं म्हणते".

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com