दोघांना एकत्र पाहिले अन् त्याच वेळी ठरवले...

वृत्तसंस्था
Tuesday, 24 March 2020

दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा अनेक दिवसांपासून संशय होता. पण, एक दिवस संशय खरा ठरला आणि त्याच वेळी ठरवले की विषय कायमचाच संपवायचा आणि प्रियकराचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

मेरठ (उत्तर प्रदेश): दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा अनेक दिवसांपासून संशय होता. पण, एक दिवस संशय खरा ठरला आणि त्याच वेळी ठरवले की विषय कायमचाच संपवायचा आणि प्रियकराचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

देशात लॉकडाउन अन् जोडप्याचे मोटारीत नको ते उद्योग...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू सैनी (वय २५) हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. मुस्तफाबाद जवळ त्याचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाजवळ दोन दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. तपासादरम्यान गुलफाम कस्बे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

मैत्रिणीला फिरायला घेऊन इटलीला गेला अन्...

गुलफामने चौकशीदरम्यान सांगितले की, माझी पत्नी आणि मोनूमध्ये प्रेमसंबंध होते. होळीच्या आदल्या दिवशी दोघांना रंगेहाथ पडकले होते. त्याचवेळी त्याचा काटा काढण्याचे ठरवले होते. मोनूला दारू पाजली आणि त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला.

हनिमूनच्या रात्री पत्नी लागली तडफडायला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested one in murder case at up