
उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर पोलीस त्यांच्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. एका पोलीस निरीक्षकाच्या कृतीमुळे येथील पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या पोलीस निरीक्षकाने मध्यरात्री एका क्षुल्लक कारणावरून पीआरडी जवानाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली. या संदर्भात पीआरडी जवानाने त्याच पोलीस ठाण्यात निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.